छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस’. हा शो कायम स्पर्धकांना देणाऱ्या येणाऱ्या टास्कमुळे आणि स्पर्धकांच्या फॅशनसेन्समुळे चर्चेत असतो. बिग बॉसच्या घरात राहूनही सेलिब्रिटी त्यांचा स्टारडम जपत असतात. ‘बिग बॉस १३’मध्ये सहभागी झालेली शहनाज गिलदेखील तिच्या फॅशनसेन्समुळे अनेक वेळा चर्चेत आली होती. परंतु, या घरात येण्यापूर्वी शहनाजने डिझायनरकडून घेतलेले कपडे अद्यापही तिने डिझायरला परत न केल्याचं सांगण्यात येत आहे.

‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्यापूर्वी शहनाजने दिल्लीस्थित एका डिझायनरकडून कपडे भाड्याने घेतले होते. अभिनेत्री माही विजच्या मदतीमुळे शहनाजला हे कपडे मिळाले होते. परंतु, शो संपल्यानंतरही डिझायनरला तिचे कपडे परत मिळाले नाहीत. या प्रकरणी डिझायनरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माही आणि शहनाजवर कपडे परत न दिल्याचा आरोप केला आहे. या डिझायनरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर या विषयी माहिती देत तिच्यातील आणि माहीमधील संभाषणाचे काही मेसेजदेखील शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

This is an issue which we need to bring forward. How unethical and low mentality these famous faces are. mahhivij is one of them. At the time of Big Boss , she sourced outfits from us for @shehnaazgill and that was an outsourcing only. After big boss got over we asked her to send the outfits back , she sent few and kept rest of the outfits with her , when asked she said she will send them asap. We saw her wearing those outfits without even informing us. Isn”t this such a shame that being a famous face you want to wear new outfits but not willing to pay for them ? . You are asking outfits for someone else and keeping them and flaunting them shamelessly. Being asked again and again she ruthlessly made an excuse of being a mother. Like you weren’t a mother when you were wearing our outfits and roaming in them. She only owe 25k to us which she isn”t able to pay and making excuses and blocked us. We wonder how you worked in the industry , is this your true face? Pretending to be the sweetest on social media and such an unethical person inside.! (Ps- Stop dragging shehnaaz . This has nothing to do with her. We only have an issue with maahi vij. )

A post shared by Made For Her Label® (@__madeforher__) on

शहनाज ‘बिग बॉस १३’ मध्ये सहभागी होण्यापूर्वी माही विजने दिल्लीतील एका डिझायनरकडून शहनाजसाठी कपडे उधार घेतले होते. त्याच्या बदल्यात शहनाजने या डिझायनरला कपड्यांचं क्रेडिट द्यावं असंही ठरलं होतं. परंतु, शहनाजने डिझायनरला क्रेडिट आणि कपडे दोन्हीही दिले नाहीत.

दरम्यान,नैना जिंदलने ‘बिग बॉस १३’ मध्ये सहभागी झालेल्या शहनाज गिल, रश्मी देसाई, माहिरा शर्मा, देवोलीना भट्टाचार्जी, शेफाली जरीवाला या स्पर्धकांना डिझायनर कपडे दिले होते.