News Flash

अभिनेत्री माही विजच्या भावाचे निधन

भावाचा फोटो शेअर करत भावनिक पोस्ट लिहिली आहे.

काही दिवसांपूर्वी माहीच्या भावाला करोना झाला होता.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री माही विजच्या भावाचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे. करोनामुळे त्याचे निधन झाल्याचे समोर आले आहे. माहीने सोशल मीडियावर भावाचा फोटो शेअर करत भावाच्या निधनाची माहिती दिली आहे. दरम्यान तिने अभिनेता सोनू सूद आणि कॉमेडियन भारती सिंहचे आभार मानले आहेत.

माही विजने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर भावाचा फोटो शेअर करत भावनिक पोस्ट लिहिली आहे. ‘मी तुला गमावले नाही. तू माझी ताकद आहेस. माझे तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे आणि ते नेहमी करत राहिन. मला शक्य असतं तर मी काही दिवस मागे गेले असते. तुला मिठी मारली असती आणि तुला कधीही जाऊ दिले नसते. तू माझ्यासाठी हिरो आहेस’ या आशयाचे कॅप्शन तिने दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahhi tarakhushirajveer (@mahhivij)

आणखी वाचा : यामी गौतम पाठोपाठ ‘ये जवानी…’मधील ‘लारा’ने केले लग्न

काही दिवसांपूर्वी माहीच्या भावाला करोना झाला होता. त्यानंतर बॉलिवूड अभिनेता सोनू सूद आणि कॉमेडियन भारती सिंहने तिला मदत केली होती. माहीने सोनू सूदच्या ट्वीटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahhi tarakhushirajveer (@mahhivij)

स्क्रीनशॉट शेअर करत तिने, ‘माझ्या भावासाठी रुग्णालयात बेड मिळवून दिल्याबद्दल सोनू सूद तुझे आभार. या कठीण कळात मला तू हिंमत दिलीस. तुम्ही माझी मदत केल्याबद्दल तुमचे आभार’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. तसेच माहीने भारतीचे देखील आभार मानले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 12:45 pm

Web Title: mahhi vij loses her brother to covid 19 and thanks to sonu sood for finding a hospital bed avb 95
Next Stories
1 एकता कपूरची ऑडिओ क्लिप लीक झाल्यानंतर दिव्या खोसला कुमारचा नवा खुलासा
2 वयाच्या ८५ व्या वर्षी वॉटर एरोबिक करतानाचा धर्मेंद्र यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
3 सायरा बानो यांनी शेअर केला दिलीप कुमार यांचा रुग्णालयातील फोटो
Just Now!
X