News Flash

मुलीच्या जन्मानंतर दत्तक घेतलेल्या मुलांना सोडले? म्हणणाऱ्यांना माहीने दिले सडेतोड उत्तर

माहीने एका मुलाखतीत ट्रोलर्सला उत्तर दिले आहे.

(Photo Credit : Mahhi Vij Instagram)

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कपल म्हणजे अभिनेत्री माही विज आणि अभिनेता जय भानुशाली. त्यांना तीन मुले आहेत. खुशी, राजवीर आणि तारा. तारा ही त्यांची स्वत: ची मुलगी आहे. तर खुशी आणि राजवीर हे दत्तक घेतलेली. ताराच्या जन्मानंतर दत्तक घेतलेल्या मुलांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल अनेकदा त्यांना ट्रोल केले जाते. आता माहीने यावर तिचं स्पष्टीकरण दिलं आहे.

माहीने नुकतीच ‘झूम’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने दत्तक मुलांनावरुन ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. “आम्ही राजवीर आणि खुशीला दत्तक घेतलेले नाही. त्यांचे आई-वडील आहेत. त्यांचे वडील अजूनही आमच्यासोबत काम करतात. त्यांना एक आई आहे. फक्त एवढंच आहे की जन्म झाल्यापासून ते आमच्यासोबत राहिले आहेत. ते मला मम्मा आणि जयला डॅडा बोलतात. माझ्या मुलांच आणि माझं नातं हे वेगळं आहे. आम्ही सगळे एकत्र होतो. आम्ही एका कुटुंबासारखे आहोत. कायदेशीरपणे आम्ही त्यांना दत्तक घेतलेले नाही. हे सगळं कुठून आलं हे मला माहित नाही. मला कोणाला कोणत्याही प्रकारचं स्पष्टी करण देण्याची गरज वाटतं नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahhi tarakhushirajveer (@mahhivij)

ती पुढे म्हणाली, “राजवीर आणि खुशी त्यांच्या गावी परत गेले आहेत कारण त्यांच्या आजोबांना वाटते की ते गावी राहिले तर अधिक सुरक्षित राहतील.

आणखी वाचा : या बॉलिवूड अभिनेत्रींनी प्रेमासाठी केलं धर्म परिवर्तन?

जय आणि माही त्यांच्या इथे काम करण्याऱ्या महिलेच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलतं आहेत. तर २०१९ मध्ये माहीने ताराला जन्म दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2021 10:33 am

Web Title: mahhi vij says she never adopted her foster kids rajveer and khushi they have parents we were like a happy family dcp 98
Next Stories
1 “मेकर्सना गुणांपेक्षा गरिबी दाखवण्यात जास्त इंट्रेस्ट”; इंडियन आयडल अभिजीत सावंतचा खुलासा
2 Birthday Special : दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरचं खरं नाव माहितीये का?
3 ब्रेकअपनंतरही मनिषा कोईरालाला विसरु शकले नव्हते नाना पाटेकर; आठवणीत म्हणाले होते….
Just Now!
X