News Flash

आईवर बलात्कार करेन अशी धमकी देणाऱ्याला अभिनेत्री म्हणाली येथे भेटून दाखव

माहीने त्या ट्रोलरला खडेबोल सुनावले

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री माही विज आणि जय भानुशालीने ‘मुझसे शादी करोगे’ या कार्यक्रमात हजेरी लावली. शोमध्ये पारस छाबरा आणि शहनाज गिल यांच्यासोबत गप्पा मारल्यानंतर त्या दोघांनाही सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. एका ट्रोलरने तर माही आणि जयच्या मुलीचे नाव घेतले असून आईचा बलात्कार करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर माहीने त्या ट्रोलरला खडेबोल सुनावले आहेत.

‘माझ्या मुलीचे नाव मध्ये घेऊ नको. तुझ्यात दम असेल तर समोर येऊन बोल… अन्यथा भुंकण्याची गरज नाही. लाज वाटते तुझी. तुमच्या सारख्या लोकांना जन्म दिल्याने तुमच्या कुटुंबीयांना लाज वाटत असेल’ असे माहीने ट्विटमध्ये लिहित ट्रोलरला सुनावले आहे.

स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, एका ट्रोलरने केवळ तिच्या मुलीचे नाव घेतले तर दुसऱ्या ट्रोलरने ‘मी तुझ्या आईचा बलात्कार करेन’ असे देखील म्हटल्याचे माहीने सांगितले. त्यानंतर माहीला प्रचंड राग आला. तिने त्या ट्रोलरला हिंमत असेल तर ओशिवरा पोलीस ठाण्यात येऊन भेट असे म्हटले. त्यानंतर काही वेळातच माही ओशिवरा पोलीस ठाण्यात जाऊन ट्रोलरची वाट पाहत होती. तेथे तिने एक तास त्या व्यक्तीची वाट पाहिली. पण तो आला नाही. त्यानंतर त्याने काही वेळातच त्याचे ट्विट डिलिट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2020 4:32 pm

Web Title: mahhi vij waits at police station challenging troll who threatened to rape her mother avb 95
Next Stories
1 पाच वर्षांनंतर ‘या’ अभिनेत्रीचं मराठी कलाविश्वात पदार्पण
2 विठुमाऊली मालिकेची भक्तीपूर्ण होणार सांगता
3 मलायकाने कपडे घातले की नाही? व्हिडीओ पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न
Just Now!
X