News Flash

जय भानुशाली लेकीच्या पाया पडला…पत्नी माहीने शेअर केला व्हिडिओ

२०१९ साली माहीने ताराला जन्म दिला आहे

टीव्ही कलाकार जय भानुशाली आणि माही विज हे दोघेही आपल्या मुलांसह कायम चर्चेत असतात. ते सोशल मीडियावर कायम काही ना काही शेअर करत असतात. आताही माही विजने आपल्या लेकीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तिचा पती जय आपल्या लेकीच्या पाया पडत आहे.

जय आणि माही यांची मुलगी तारा या व्हिडिओमध्ये निळ्या रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये दिसत आहे. तिने यात छान टिकली आणि बिंदीही लावली आहे. तसंच ती आपल्या परिवारातल्या सदस्यांना आशिर्वादही देत आहे. या व्हिडिओमध्ये ती खूपच गोड दिसत आहे. या व्हिडिओवर चाहते भरपूर कमेंट्स करत आहेत. माही आणि जयसोबत घरातले सगळेच सदस्य ताराच्या पाया पडत आहेत. ताराही हे सगळं एन्जॉय करत आहे आणि खूप छान एक्प्रेशन्सही देत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahhi tarakhushirajveer (@mahhivij)

अनेकांनी या व्हिडिओवर कमेंटही केल्या आहेत. बिग बॉस १३ फेम रश्मी देसाई या व्हिडिओवर कमेंट करताना म्हणते, ज्या पद्धतीने ताराने ओढणी घेतली आहे आणि राणीसारखी बसली आहे ते तर आम्ही पण करु शकत नाही. या शिवाय सना मकबूल आणि विशाल सिंह यांनीही या व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत.

जय आणि माही यांनी २०१७ साली खुशी आणि राजवीर अशी दोन मुलं दत्तक घेतली. २०१९ साली माहीने ताराला जन्म दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2021 7:03 pm

Web Title: mahi vij shares a video in which jay bhanushali is touching the feet of daughter tara vsk 98
Next Stories
1 तू तुझ्या देशात परत जा!, अमेरिकेत दिग्दर्शकावर झालेल्या वर्णभेदावर प्रियांकाने केले वक्तव्य
2 “तू म्हणजे कंगनाचं मेल व्हर्जन”; ट्रोलर्सला अभिनेत्यानं दिलं सडेतोड उत्तर!
3 ‘आई आणि अब्बा एकत्र…’, घटस्फोटानंतर सारामुळे एकत्र आले सैफ आणि अमृता
Just Now!
X