आसामचे माजी मुख्यमंत्री तरूण गोगोई यांचं निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. गेल्या काही काळात त्यांची प्रकृती खालावली होती. गुवाहाटी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. अभिनेत्री माहिका शर्मा हिला तरूण गोगोई यांच्या निधनाच्या बातमीनं जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. आज पुन्हा एकदा मी माझे वडील गामावले असं म्हणत तिने आपलं दु:ख व्यक्त केलं आहे.

“त्यांच्या जाण्यामुळे आज मी खूप दु:खी आहे. असं वाटतंय आज मी पुन्हा एकदा माझे वडील गामावले. मला आठवतंय त्यांनी मला कधीही हार न मानण्याचा सल्ला दिला होता. त्यांचा तो हसतमुख चेहरा आजही माझ्या डोळ्यांसमोर येतो.” अशा आशयाची इन्स्टापोस्ट लिहून माहिराने तरूण गोगोई यांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.