News Flash

पॉर्नस्टारसोबत मैत्री केल्याने अभिनेत्रीला बसला फटका

माहिकाने डॅनी डीशी मैत्री केली होती.

अभिनेत्री माहिका शर्मा ही सोशल मीडियाद्वारे बिनधास्तपणे तिचे मत मांडताना दिसते. २ जुन हा दिवस इंटरनॅशनल सेक्स वर्कर्स डे म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी माहिकाने तिच्या आयुष्यातील एक किस्सा सांगितला आहे. त्यावेळी तिने पॉर्नस्टारशी मैत्री केल्याने अनेकजण तिला देखील पॉर्नस्टार समजत असल्याचे सांगितले.

माहिकाने डॅनी डीशी जेव्हा मैत्री केली तेव्हा तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचा खुलासा तिने केला आहे. ‘तो माझ्या आयुष्यातील कठीण काळ होता. डॅनी सोबत मैत्री असल्यामुळे लोकं मलाही सेक्स वर्कर समजत होते. लोकं सत्य समजून न घेता माझ्यावर आरोप करायचे. त्यावेळी मला मानसिकदृष्ट्या त्रास झाला होता’ असे माहिकाने सांगितले.

आणखी वाचा : ‘फ्रीमध्ये मनोरंजन करु नका’, कविता कौशिकचा करण- निशाला अप्रत्यक्ष टोला

पुढे माहिका म्हणाली, ‘माझ्या आयुष्यात खूप काही सुरु होते. डॅनीसोबत मैत्री केल्याने मला फटका बसला होता. त्यावेळी मला जाणावले एक सेक्स वर्कर असणे कठीण असते. त्यांना जगण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो. त्यानंतर मी त्यांच्यामध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी काम करु लागले. अनेकजण सेक्स वर्कर्सला चांगली वागणूक देत नाहीत. त्यांना हिंसेचा सामनादेखील करावा लागत आहे.’

माहिकाने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्यामधील ‘रामायण’, ‘F.I.R’ आणि ‘तू मेरे अगल बगल’ या मालिकांमधील तिची भूमिका गाजली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2021 12:26 pm

Web Title: mahika sharma said i was assumed to be a sex worker avb 95
Next Stories
1 “माझा पती काही कामाचा नाही आणि…”, अनिता हसनंदानीने शेअर केले पतीसोबतचे चॅट
2 लंडनला एकत्र फिरायला जाण्यासाठी अमिताभ-जया यांनी घेतला होता लग्नाचा निर्णय
3 “भयानक डान्सर आहे”, नव्या डान्स व्हिडीओमुळे ‘दिया और बाती’ फेम दीपिका सिंह पुन्हा ट्रोल
Just Now!
X