News Flash

महिमा चौधरीच्या भावाचा आणि वहिनीचा अपघातात मृत्यू

पोलिसांनी गाडीची खिडकी कापून मृतदेह बाहेर काढला

महिमा चौधरी

अनेक दिवसांपासून सिनेसृष्टीपासून दूर असलेली अभिनेत्री महिमा चौधरी सध्या कठीण प्रसंगातून जात आहे. तिच्या मामाच्या कुटुंबियांचा मेरठ- हापुड मार्गावर कार अपघात झाला. या अपघातात महिमाचा मामे भाऊ आणि त्याची बायको यांचा मृत्यू झाला असून मामाची प्रकृती चिंताजनक आहे.

नवाज, शाहरुख अडचणीत ५०० कोटींच्या घोटाळ्यात उघड झाले नाव

महिमाच्या मामाचे कुटुंबिय हापुडच्या जवळपास राहतात. तिचे मामा, मुलगा आणि सुनेसोबत डॉक्टरकडे जात होते. तिथून परतताना त्यांची गाडी समोरुन येणाऱ्या बसला आदळली. या अपघातात महिमाच्या भावाचा जागीच मृत्यू झाला. तिघांनाही रुग्णालयात नेले जात असताना उपचारांदरम्यान वहिनीनेही अखेरचा श्वास घेतला. रात्री मामांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना दिल्लीला नेण्यास सांगण्यात आले.

…म्हणून सनी लिओनीला सलमान सर्वात जास्त आवडतो

हा अपघात एवढा गंभीर होता की, बसच्या धडकेमुळे कारची पूर्ण दूर्दशा झाली. गाडी चालवत असलेल्या भावाचे सूर्यप्रतापचे शरीर गाडीतच अडकून राहिले. नंतर पोलिसांनी गाडीची खिडकी कापून मृतदेह बाहेर काढला. असे म्हटले जाते की या कठीण प्रसंगावेळी महिमा चौधरी मुंबईहून गावी कुटुंबियांना भेटायला जाऊ शकते. तर दुसरीकडे खारखौदामध्ये अज्ञात बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2017 6:47 pm

Web Title: mahima chaudhary brother and sister in law dead in car accident
Next Stories
1 Mubarakan song Hawa Hawa: अर्जुन तिचा बॉयफ्रेंड बनण्यासाठी तयार
2 VIDEO : इतिहासातील राजकीय घडामोडींना पुन्हा जागवणारा ‘राग देश’
3 पहिल्यांदाच नवाजुद्दीन, तमन्ना भाटिया, सुनील शेट्टी दिसणार या मराठी चित्रपटात
Just Now!
X