करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. संपूर्ण जगात पसरलेल्या या प्राणघात विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दरम्यान प्रसिद्ध अभिनेत्री माहिरा खान हिला करोनाची लागण झाली आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने घरातच तिच्यावर उपचार सुरु आहेत.

अवश्य पाहा – आई म्हणणाऱ्या विद्यार्थ्याला सनी लिओनीचं प्रत्युत्तर; म्हणाली, हा मुलगा तर…

“मला करोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया आपली करोना टेस्ट करावी. अन् रिपोर्ट येईपर्यंत क्वारंटाइनमध्येच राहावे ही विनंती. करोनावर अद्याप लस आलेली नाही त्यामुळे स्वत:ची काळजी घ्या. व योग्य ती काळजी घेऊनच घरातून बाहेर पडा.” अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट लिहून माहिराने आपल्या चाहत्यांना सावध केलं आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – ‘अशी लोकच हिंसेला प्रोत्साहन देतात’; योगराज सिंग यांच्या भाषणावर दिग्दर्शक संतापला

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahira Khan (@mahirahkhan)

महाराष्ट्रात २७०० पेक्षा जास्त करोना रुग्णांना दिवसभरात डिस्चार्ज

महाराष्ट्रात २७७४ करोना रुग्ण बरे होऊन आज दिवसभरात घरी गेले आहेत. राज्यातील एकूण १७ लाख ४९ हजार ९७३ रुग्णांनी आत्तापर्यंत करोनावर मात केली आहे. यामुळे महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९३.४६ टक्के झाला आहे. आज राज्यात ४ हजार २६८ करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर राज्यात आज ८७ मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील मृत्यू दर सध्या २.५७ टक्के इतका आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.