आपल्याला नेहमीच वाटते की कलाकार असो किंवा सेलिब्रिटींच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी अगदी ठरवल्याप्रमाणे पार पडतात. पण आपला हा समज किती फोल असतो हे अभिनेत्री माहिरा खान हिच्याबाबतच्या एका उदाहरणावरून समजू शकते. त्यामुळे कलाकारांनाही आपल्याप्रमाणेच लहानसहान समस्यांना सामोरे जावे लागते, हे दिसून येते.

‘रईस’ फेम माहिरानेही नुकतेच आपल्या डोकेदुखीचे कारण स्पष्ट केले. माहिराने तिच्या आईसोबतच्या संभाषणाचा एक स्क्रिन शॉट सोशल मीडियावर शेअर केला. मोबाईलमधील ऑटो-करेक्ट या फिचरमुळे दोघींतील हे संभाषण अधिक मजेशीर झाले आहे.

indian army 140th technical graduate course Apply Online for 30 Officers Posts, Check Notification and Eligibility
भारतीय सैन्यात नोकरीची संधी! तांत्रिक पदवी अभ्यासक्रमासाठी ‘इतक्या’ पदांची भरती; असा करा अर्ज
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका
Do you know the beginnings of Gmail
जीमेलची सुरुवात आणि एप्रिल फूल कनेक्शन तुम्हाला माहित्येय का?
IFS officer Himanshu Tyagi Four tips to unlock success during challenges Of IIT JEE Preparation is a must read
IIT मध्ये प्रवेश करण्याचे आहे स्वप्न ? मग अशा पद्धतीने करा तयारी; आयएफएस अधिकाऱ्यांनी शेअर केल्या टिप्स

हा स्क्रिन- शॉट शेअर करताना तिने लिहिले की, सध्या मी आणि आई दोघंही ऑटो- करेक्टमुळे हैराण झालो आहोत. आईला स्वतःची काळजी घे आणि ‘अझ्झु’चीही घे असा साधा सरळ मेसेज लिहायचा होता. पण ऑटो-करेक्टच्या घोळामुळे अझ्झु हे नाव पहिल्यांना ‘अझ्युमिंग’ असे आले तर दुसऱ्यांदा ‘अझिरे’ असे टाइप झाले. शेवटी तिला जे लिहायचे होते ते तिने नीट लिहिले.

हे तर झाले माहिरासोबत पण तिच्या आईसोबतही असाच काहीसा मजेशीर किस्सा घडला. तिच्या आईला खरे तर तिच्या बोलण्यानंतर ‘ओके मेरी जान’ असे लिहायचे होते. पण ऑटो-करेक्टमुळे ‘ओके मेरी जपान’ टाईप झाले.

माहिरा खानने तिच्या याच चॅटचा स्क्रिन- शॉट काढला आणि ‘मला हे सोशल मीडियावर टाकावसंच वाटतंय. सध्या मी आणि आई दोघीही ऑटो-करेक्टमुळे त्रस्त आहोत.’ तिने ही इमेज सोशल मीडियावर शेअर केल्यावर ट्विटरकरांनी एकापेक्षा एक कमेंट द्यायला सुरूवात केली. त्यांच्या या कमेंट वाचून तुम्हीही भरपूर हसाल यात काही शंका नाही.