News Flash

‘मैने प्यार किया’ फेम भाग्यश्रीचा कमबॅक; ‘या’ सुपरस्टार अभिनेत्यासोबत करणार काम

'ही' अभिनेत्री वयाच्या ५१ व्या वर्षी करतेय सिनेसृष्टीत पुनरागमन

‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी भाग्यश्री आता सिनेसृष्टीत पुनरागमन करण्याची तयारी करत आहे. सलमानसोबत झळकलेली ही अभिनेत्री चक्क बाहुबली प्रभाससोबत कमबॅक करणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाग्यश्री काही कौटुंबिक कारणांमुळे सिनेसृष्टीपासून दुर होती. परंतु प्रेक्षकांच्या आग्रहास्तव तिने पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला आहे.

पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत भाग्यश्रीने आपल्या आगामी चित्रपटाची माहिती दिली. ती म्हणाली, “गेल्या वर्षांपासून मी रुपेरी पडद्यावर झळकलेली नाही. खरं तर या दरम्यान मला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या. वाट्टेल तितके पैसे देण्यास निर्माते तयार होते. परंतु पटकथा न आवडल्यामुळे मी त्या चित्रपटांना नकार दिला. परंतु माझ्या चाहत्यांपासून मी दिर्घकाळ दूर राहू शकत नाही. त्यामुळे चाहते आणि माझी मुलगी यांच्या आग्रहास्तव मी पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आहे.”

भाग्यश्री आपल्या कमबॅक चित्रपटामध्ये अभिनेता प्रभाससोबत झळकणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात झाली होती. मात्र लॉकडाउनमुळे चित्रीकरण अर्ध्यावरच थांबवावे लागले. या चित्रपटाचे नाव व व्यक्तिरेखेसंदर्भात भाग्यश्रीने काहीही माहिती दिली नाही. येत्या काळात ती या चित्रपटाची अधिकृत घोषणा करेल त्यावेळी सर्वांनाच याबाबत समजेल असं ती म्हणाली. दरम्यान भाग्यश्रीच्या कमबॅकमुळे तिचे चाहते मात्र आनंदी झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2020 6:05 pm

Web Title: maine pyar kiya fame bhagyashree to star opposite prabhas in her comeback film mppg 94
Next Stories
1 आजारी असलेल्या आईला भेटण्यासाठी असा केला अभिनेत्याने मुंबई ते गुजरात प्रवास
2 ओठांवरुन ट्रोल करणाऱ्यांना अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडचे उत्तर
3 लॉकडाउनमध्ये अभिनेत्याने डॉक्टरशी बांधली लग्नगाठ
Just Now!
X