08 December 2019

News Flash

‘मैंने प्यार किया’मधील ‘या’ अभिनेत्रीला खावी लागली होती तुरुंगाची हवा

'मैंने प्यार किया' हा चित्रपट सुपरहिट झाला होता.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि भाग्यश्री यांच्या जबरदस्त जुगलबंधीमुळे गाजलेला ‘मैंने प्यार किया’ हा चित्रपट आजही बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी म्हणून ओळखला जातो. या चित्रपटात झळकलेल्या अभिनेत्री हुमा खान हिला चक्क तुरुंगाची हवा खावी लागली होती.

‘मैंने प्यार किया’ हा चित्रपट सुपरहिट झाला, मात्र त्यानंतर हुमाला चित्रपटांमध्ये काम करण्याची फारशी संधी मिळाली नाही. त्यामुळे मुंबई सोडून ती पुण्याला राहायला गेली. पुण्याला जाण्याआधी तिने आपल्या घरातील मोलकरणीला कामावरुन काढले. मात्र, तिच्या लहान मुलीला ती गुपचूप स्वत:बरोबर घेऊन गेली. या मुलीकडून ती भरमसाठ काम करुन घ्यायची. तसेच त्या मुलीचे मानसिक शोषण देखील हुमा करत होती. आईला न विचारता घरातील कामे करण्यासाठी मुलीला पुण्याला घेऊन गेल्यामुळे हुमा विरोधात पोलिस तक्रार केली गेली. पोलिस तपासादरम्यान मुलीच्या आईने हुमाविरोधात केलेले आरोप सिद्ध झाले. परिणामी तिला तीन वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला.

‘मैंने प्यार किया’ या चित्रपटात हुमा दुधवालीच्या भूमिकेत झळकली होती. तसेच अनिल कपूर आणि अमृता सिंग यांच्या चमेली की शादी या चित्रपटामध्ये देखील तिने काम केले होते.

First Published on October 9, 2019 7:15 pm

Web Title: maine pyar kiya huma khan salman khan mppg 94
Just Now!
X