News Flash

‘मी सुखरुप आहे, अफवा पसरवणारे…’; गौतमी देशपांडे अपघातातून थोडक्यात बचावली

तिची पोस्ट चर्चेत आहे.

‘माझा होशील ना’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे गौतमी देशपांडे. ती सतत सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांशी संवाद साधताना दिसते. सध्या सोशल मीडियावर गौतमीचा एक व्हिडीओ चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये ती मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गाडीचा अपघात होणार होता. पण त्यातून थोडक्यात वाचली असे सांगताना दिसत आहे.

गौतमी ही मुळची पुण्याची आहे. पण कामानिमित्त ती मुंबईमध्ये राहते. पुण्याहून मुंबईत येत असतानाच अनुभव तिने व्हिडीओद्वारे सांगितला आहे. ती म्हणाली, ‘मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गाडी चालवत असताना खोपालीच्या अलीकडे अचानक माझी गाडी स्लिप होऊ लागली. माझ्या गाडीचा स्पीड कमी असल्यामुळे मला ती डावीकडे थांबवता आली. त्याचवेळी माझ्या मागून आलेली गाडी स्लिप झाली आणि धडकली. सुदैवाने गाडीत असणाऱ्या कोणालाही दुखापत झाली नाही.’

आणखी वाचा : ‘आम्ही वाचवण्याचा प्रयत्न केला, पण…’, मुलाच्या आत्महत्येवर कबीर बेदींचा खुलासा

पुढे ती म्हणाली, ‘मी खूप घाबरले होते. मी एक्सप्रेस वेवरील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. रस्त्यावर डिझेल सांडल्यामुळे गाडी स्लिप झाल्याचे त्यांनी मला सांगितले. तसेच त्यांनी तो रस्ता निट केल्याची माहिती देखील मला दिली.’

हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर गौतमीचा अपघात झाल्याच्या अफवा सुरु होता. त्यानंतर तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित ‘माझी काळजी करु नका.. माझा अपघात झालेला नाही.. मी सुखरुप आहे. मी माझा अनुभव सांगितला जेणे करुन इतरांना मदत होईल. माझा अपघात झाल्याच्या अफवा पसरवणारी लोकं खरच मुर्ख आहेत’ असे म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2021 1:42 pm

Web Title: majha hoshil na actress gautami deshpande shares car accident incident on social media avb 95
Next Stories
1 आमिर खानने तब्बल १२ दिवस आंघोळ केली नाही!; कारण ऐकून म्हणाल…
2 लारासाठी स्वतः डिझाईन केली अंगठी; अशी आहे लारा आणि महेश भूपतीची प्रेमकहाणी!
3 लाडक्या लेकासोबत हार्दिक पांड्याचे खास क्षण; अनुष्का शर्माने केली कमेंट
Just Now!
X