01 December 2020

News Flash

‘दिवाळी मात्र ह्या आजारानं खाल्ली’; करोनावर मात करताच विराजस कुलकर्णीची खास पोस्ट

विराजसने शेअर केला करोना काळातील अनुभव

करोना विषाणूने सध्या सर्वत्र थैमान घातलं आहे. आतापर्यंत सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना करोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळालं. यामध्येच माझा होशील ना फेम विराजस कुलकर्णी यालादेखील काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. मात्र, आता विराजसने करोनावर मात केली असून या काळातील अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे.

‘माझा होशील ना’ या मालिकेत विराजस सध्या मुख्य भूमिका साकारत असून आदित्य असं त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या मालिकेचा आणि विराजसचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे. यामध्येच विराजसला करोनाची लागण झाली आणि ही माहिती त्याने चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यानंतर अनेकांनी त्याला लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. विशेष म्हणजे करोनावर मात केल्यानंतर विराजसने इन्स्टा पोस्ट करत करोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचं सांगितलं. सोबतच या काळातील अनुभव कसा होता हेदेखील सांगितलं.

“Hey guys… मागचे १० दिवस २ गोष्टी झाल्या – एक म्हणजे मी social media वरून गायब झालो होतो, आणि दुसरं – तुमच्या सगळ्यांच्या DM आणि comments चा भडिमार होत होता… सगळ्यांना उत्तर देणं शक्य नव्हतं. But as many of you guessed, I was found Covid positive last week (so technically ३ गोष्टी झाल्या) पण tension घ्यायचं काही कारण नाही. जो त्रास व्हायचा होता तो संपलाय, आणि नशिबाने सुट्टीसाठी पुण्याच्या घरीच होतो.

दिवाळी मात्र ह्या आजारानं खाल्ली, पण आता पुन्हा shooting साठी सज्ज झालो आहे, आणि आपण TV var आणि इथे भेटत राहूच,” अशी पोस्ट विराजसने केली आहे.

दरम्यान, माझा होशील ना या मालिकेचं मुंबईत चित्रीकरण सुरु होतं.मात्र, काही कामानिमित्त त्याला पुण्यात जावं लागलं. याच काळात त्याला त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्याने करोना चाचणी केली व त्याचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर तो घरीच आयसोलेट झाला होता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 10:54 am

Web Title: majha hoshil na fame actor virajas kulkarni recover from corona ssj 93
Next Stories
1 ठरलं तर! प्रभासचा आदिपुरुष ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
2 ‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिकेचा वाद अखेर संपुष्टात
3 सलमानच्या ड्रायव्हरला करोनाची लागण
Just Now!
X