News Flash

आदित्य देसाई विरूद्ध आदित्य देसाई, ‘माझा होशिल ना’मध्ये नवे वळण

आदित्य ग्रुप ऑफ कंपनीजच्या मालकाच्या खुर्चीत आदित्यला बसवण्यासाठी ब्रह्मेंनी एक प्रेस कॉन्फरन्स भरवली आहे

प्रेस कॉन्फरन्समध्ये नवाच आदित्य देसाई अवतीर्ण होतो आणि कंपनीवर हक्क सांगू लागतो.

झी मराठीवरील ‘माझा होशिल ना’ ही लोकप्रिय मालिका आता एका रंजक वळणावर आली आहे. प्रेक्षकांनी गेल्या काही भागात पाहिलं की जेडीने आदित्यवर हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यातून आदित्य जरी सुखरूप बचावला असला तरी आदित्यला आता त्याच्या भूतकाळाबद्दल आणि खऱ्या ओळखीबद्दल सांगायला हवं असं सगळ्या मामांना पटलंय.

आदित्य ग्रुप ऑफ कंपनीजच्या मालकाच्या खुर्चीत आदित्यला बसवण्यासाठी ब्रह्मेंनी एक प्रेस कॉन्फरन्स भरवली आहे. ज्यात आदित्य देसाईची साऱ्यांशी ओळख करून देणं हा त्यांचा हेतू आहे. मात्र सई आदित्यला या बद्दल काहीच कल्पना नाहिये आणि आयत्या वेळेस काहितरी घोळ होऊ शकतो ही भिती मनात घोळतेय. त्यातच या प्रेस कॉन्फरन्समध्ये नवाच आदित्य देसाई अवतीर्ण होतो आणि कंपनीवर हक्क सांगू लागतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

त्यामुळे गोंधळात अजूनच भर पडते. नवा पेच तयार होतो. ज्यातून सुटणं कठीण आहे. आता या दोन आदित्य देसाई मधला खरा आदित्य देसाई कोण आणि हा तोतया नक्की कसा टपकलाय हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. आदित्यला सर्व सत्य कळेल का? आणि त्याला आदित्य ग्रुप ऑफ कंपनीजच्या मालकाच्या खुर्चीत बसवण्यात मामा यशस्वी होतील का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल. भावी काळात आदित्य विरुद्ध आदित्य असा सामना रंगू लागेल अशी चिन्हं आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2021 4:33 pm

Web Title: majha hoshil na serial update avb 95
Next Stories
1 करीना कपूरचा दुसरा मुलगा ‘जेह’चे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल; चाहते म्हणाले…
2 Video: गाडी बंद न करताच हृतिक खाली उतरला अन्….
3 ‘ये दिल मांगे मोअर’, अंगावर रोमांच उभे करणारा कॅप्टन विक्रम बत्राच्या शौर्यावर आधारीत ‘शेरशाह’चा टीझर प्रदर्शित
Just Now!
X