छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘माझ्या नवऱ्याची बायको.’ या मालिकेतील शनाया, राधिका, माया आणि गुरुनाथ सुभेदार ही पात्र चर्चेत होती. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी ही पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. आता मालिकेत गुरुनाथ सुभेदार हे पात्र साकारणारा अभिनेता अभिजीत खांडकेकर वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याची ‘क्रिमिनल्स – चाहूल गुन्हेगारांची’ ही नवी मालिका प्रदर्शित झाली आहे. त्यानिमित्ताने अभिजीतने लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावली. या मुलाखतीत त्याने त्याच्या जीवनाशी आणि करिअरशी निगडीत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

अशा अनेक कलाकारांच्या मुलाखती पाहण्यासाठी लोकसत्ताचे युट्यूब चॅनल ‘Loksatta Live‘ ला नक्की भेट द्या.