छोट्या पडद्यावर गाजत असलेली लोकप्रिय मालिका म्हणजे माझ्या नवऱ्याची बायको. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने त्यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. यातीलच एक अभिनेत्री म्हणज शर्मिला राजाराम शिंदे. या मालिकेमध्ये जेनी ही भूमिका साकारणारी शर्मिला अनेकांची लोकप्रिय अभिनेत्री झाली आहे. विशेष म्हणजे शर्मिला लवकरच एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर आली आहे.

व्हायरस मराठी या युट्युब चॅनेलवरील नो ब्रेकिंग न्यूज या सीरिजमध्ये ती झळकली आहे. त्यामुळे जेनीला म्हणजेच शर्मिला राजाराम हिला नव्या रुपात पाहणं प्रेक्षकांसाठी पर्वणीचं ठरलं आहे. विशेष म्हणजे या नव्या सीरिजमध्ये ती वृत्तनिवेदिकेच्या भूमिका साकारताना दिसत आहे.

sanjay ruat and shrikant shinde
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार? संजय राऊतांची थेट मोदींकडे तक्रार; म्हणाले, “बिदागीच्या रकमा…”
Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!
Udayanraje Bhosale
“…तेव्हापासून कॉलर उडवण्याची स्टाईल सुरू झाली”, उदयनराजे भोसलेंनी सांगितला यात्रेतला किस्सा
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती

नो ब्रेकिंग न्यूज ही विनोदी वेब मालिका असून त्यात शर्मिलाचा विनोदी अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मराठी आणि न्यूज विश्वात ज्या पद्धत्तीने बातम्या दिल्या जातात,त्या बातम्यांचे विषय या सगळ्यावर विनोदी पद्धतीने ही मालिका भाष्य करते. निवेदनाच्या आणि सादरीकरणाच्या अनोख्या शैलीमुळे या मालिकेला तरुणांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. दरम्यान, या नव्या वेब मालिकेचं दिग्दर्शन संतोष कोल्हे यांनी केलं असून लेखन युगंधर देशपांडे यांनी केलं आहे.