28 September 2020

News Flash

गुरूला धडा शिकवून शनाया आणि राधिका उभारणार विजयाची गुढी

 या मालिकेने एक विलक्षण वळण घेतलं आहे.

‘गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं’ असं म्हणत जवळपास तीन वर्षांपूर्वी सुरु झालेली ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय. या मालिकेने ११०० भाग पूर्ण केले आणि आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत. या मालिकेने एक विलक्षण वळण घेतलं आहे.

नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिल्याप्रमाणे माया गुरूच्या सांगण्यावरून राधिकाला ब्लॅकमेल करतेय. पण शनायामुळे राधिकाला गुरूचा सगळा प्लॅन कळतो. शनाया राधिका एकमेकांची माफी मागतात आणि एकत्र येऊन गुरूला धडा शिकवायचं ठरवतात. त्यानुसार दोघीपण आता गुरूच्या प्रत्येक छोट्यामोठ्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. मायाला आपल्या बाजूने करून गुरूला चांगलाच धडा शिकवायचा असा राधिकाचा प्लॅन आहे.

आणखी वाचा : आठ महिन्यांत महेश मांजरेकरांचा पूर्णपणे बदलला लूक; पाहा फोटो

गुडीपाडव्याच्या दिवसापासून राधिका आणि शनाया गुरूला हरवण्याचा दिशेने एक एक पाऊल उचलणार आहेत. या दोघी गुरूला कशी अद्दल घडवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2020 1:17 pm

Web Title: majhay navryachi bayko gudhi padwa special episode updates ssv 92
Next Stories
1 Coronavirus : ‘आमचे शेजारी करोनाग्रस्त’; अभिनेत्यानेच पसरवली अफवा, त्यानंतर…
2 ‘पनौती हटी’; शाहीन बागमधील आंदोलनकर्त्यांचे तंबू हटवल्यानंतर निर्मात्याचे ट्विट
3 ‘तो’ शब्द उच्चारणं पडलं होतं भारी; इमरानला मागावी लागली ऐश्वर्याची मागी
Just Now!
X