मनुष्य स्वभाव म्हटला की त्यात सारे स्वभाव वैशिष्ट्य हे आले. मग त्यात भितीही आलीच. अगदी लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत प्रत्येक व्यक्तीला ठराविक एका कोणत्याही गोष्टीची भिती वाटतच असते. या भितीपासून अभिनेता प्रियदर्शन जाधवही काही सुटलेला नाही.

‘माझ्या बायकोचा प्रियकर’ या चित्रपटामध्ये प्रियदर्शन झळकणार असून या चित्रपटातील काही भागाचं चित्रीकरण भोर येथे पार पडलं. विशेष म्हणजे हे चित्रीकरण रात्रीच्या वेळी चित्रित करण्यात आल्यामुळे प्रियदर्शन काही वेळा घाबरल्याचं पाहायला मिळालं.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

‘माझ्या बायकोचा प्रियकर’ हा चित्रपट कॉमेडी हॉरर या प्रकारात मोडणारा असून भोर येथे भूताची काही दृश्य चित्रित करायची होती. त्यामुळे सेटवर अंधार करण्यात आला होता. अशा वातावरणात चित्रीकरण करताना प्रियदर्शन बराच दचकत होता. त्याला अंधाराची भिती वाटू लागली होती. त्यामुळे प्रियदर्शन अंधाराला घाबरत असल्याचं उपस्थित साऱ्यांनाच कळून आलं.

दरम्यान, राजीव एस.रुईया दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २३ नोव्हेंबरला हा प्रदर्शित होणार असून दीपक रुईया, राजेंद्र गोयंका, प्रदीप के शर्मा, अनिता शर्मा, धवल जयंतीलाल गाडा, अक्षय जंयतीलाल गाडा यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहेत.