राजकला मुव्हीज अँड बाबा मोशन पिक्चर्स प्रा. लि. च्या बॅनर खाली निर्मित मराठी चित्रपट ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ मधील २०१८ चे पहिले धम्माल गाण ‘तू हात नको लाऊ’ मुंबई मध्ये धूमधडाक्यात प्रदर्शित करण्यात आले आहे. हे गाणं स्वरबद्ध केले आहे स्वाती शर्मा आणि नकाश अजीज यांनी तर संगीत राजू सरदार यांचे आहे. नुकतेच झी म्युझिकने हे गाणे प्रदर्शित केले असून अल्पावधीतच गाण्याला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. हे गाणे मीरा जोशी व प्रियदर्शन जाधववर चित्रित करण्यात आले आहे. या दोघांची धमाल केमिस्ट्री आणि मीराच्या मनमोहक अदा यामुळे हे गाणे अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे.

चित्रपटाचे निर्माते दिपक रुईया, प्रदिप के शर्मा, राजेंद्र गोयंका, अनिता शर्मा, धवल जयंतीलाल गाडा व अक्षय जयंतीलाल गाडा आहेत. त्याचबरोबर सह-निर्माता रेश्मा कडाकिया, कौशल कांतिलाल गाडा, निरज गाडा आहे.

वाचा : ‘अवलिया रणवीरसोबत राहणं म्हणजे…’; दीपिकाच्या हिंमतीला अक्षयने दिली दाद

कथा आणि दिग्दर्शन राजीव एस रुईया यांचे आहे. हा चित्रपट २३ नोव्हेंबर, २०१८ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. प्रस्तुतकर्ता व वितरक पेन इंडिया लिमिटेड आहे. चित्रपटात मुख्य कलाकार प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव सोबत भाग्यश्री मोटे, अंशुमन विचारे, भारत गणेशपुरे, प्रिया गमरे, पदम सिंग, सुरेश पिल्लाई, अनुपमा ताकमोघे, स्वाती पानसरे अशी तगडी स्टारकास्ट चित्रपटात आहे.