03 March 2021

News Flash

‘डान्सिंग क्वीन’च्या मंचावर ‘माझ्या नवऱ्याची बायको’चे कलाकार

'डान्सिंग क्वीन'च्या मंचावर थिरकणार राधिका आणि गुरुनाथ

झी मराठी वाहिनीवर ‘डान्सिंग क्वीन’ या रिअॅलिटी शोचं नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘डान्सिंग क्वीन- साईज लार्ज फुल चार्ज’ असा यंदाच्या सिझनचा हटके थीम आहे. या शोमध्ये १५ वर्षे व त्यावरील वयोगटाच्या मुली व महिलांनी सहभाग घेतला आहे. त्यांचं वजन ७० किंवा त्याहून अधिक असलं पाहिजे, हीच एक अट आहे. या आठवड्यात डान्सिंग क्वीनच्या मंचावर ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील राधिका आणि गुरुनाथ अवतरणार आहेत.

प्रेक्षकांना अभिजीत खांडकेकर व अनिता दाते यांचा अप्रतिम डान्ससुद्धा पाहायला मिळणार आहे. नाट्यलेखक, दिग्दर्शक व अभिनेता म्हणून प्रसिद्ध असलेला अद्वैत दादरकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे. तर या स्पर्धेत नृत्यदिग्दर्शन ओंकार शिंदे करत आहे. मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णी व आरजे मलिष्का या शोचे परीक्षक आहेत.

हा आगळावेगळा शो गुरुवार ते शनिवारी रात्री ९.३० वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 3:08 pm

Web Title: majhya navryachi bayko actors on dancing queen show ssv 92
Next Stories
1 “मला अनफॉलो करा पण सलमानवर टीका करु नका”; अभिनेत्रीची देशवासीयांना विनंती
2 “त्या दिवशी अनुरागने ड्रग्ज घेतले होते”; पायल घोषचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल…
3 अक्षय कुमार सांगतोय, “पती म्हणून माझी ही सवय सर्वांत वाईट”
Just Now!
X