News Flash

रसिका सुनीलचा बॉयफ्रेंडसोबतचा ‘हा’ फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रसिकाने सोशल मीडियावर आपल्या रिलेशनशीप बद्दल केला होता खुलासा.

photo- instagram

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रसिका सुनील सध्या बरीच चर्चेत आहे. रसिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत शनायाची भूमिकेमुळे घराघरात पोहोचली आहे. रसिका सध्या तिच्या खासगी जीवनामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रसिकाने सोशल मीडियाद्वारा एक फोटो पोस्ट केला होता. रसिकाने तिचा मित्र आदित्य बिलागीसोबतचा एक फोटो शेअर करत ती त्याच्यासोबत रिलेशनशीपमधे असल्याचं तिने सांगितले होते. ही बातमी ऐकुन चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

रसिका सुनील सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिने तिच्या बॉयफ्रेंड आदित्य बरोबर एक फोटोशूट केलं होतं. त्या फोटो शूटचे फोटो रसिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सध्या रसिका आणि आदित्यचे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. रसिका आणि आदित्यचे हा फोटो त्यांच्यामध्ये असलेल नातं दर्शवत आहे असं तिने सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

रसिकने शेअर केलेल्या फोटो खाली तिने “मी या फोटोच्या प्रेमात आहे. हा फोटो माझं आणि त्याचे नातं कसे आहे  त्याबद्दल सांगतं.” पुढे ती लिहिते की “तो (आदित्य )नेहेमीच माझी काळजी घेतो. मला सपोर्ट करतो. आदि तू बेस्ट आहेस.” असे कॅप्शन दिले. रसिकाने हा फोटो शेअर करताच इन्स्टाग्रामवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसला आहे. या फोटो बरोबरच रसिकाने एक रील पण शेअर केली आहे. या रील मध्ये ते दोघ डान्स करताना दिसले त्या रीलला तिने ” जेव्हा आमच्या मध्ये काय कॉमन आहे अस विचारतात तेव्हा आम्ही सांगतो की डान्स करणे आणि गाणं” असे कॅप्शन दिले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

दोन वर्षांपूर्वी रसिकाने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका सोडून लॉस एंजिलिसला पुढील शिक्षणासाठी गेली होती. तेथेच तिची आदित्यशी ओळख झाली असून या दोघांमध्ये जवळीक वाढल्याचं दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्री इशा केसकरने मालिका सोडल्यानंतर रसिका पुन्हा एकदा शनायाच्या भूमिकेत परतली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 1:06 pm

Web Title: majhya navryachi bayko actress rasika sunil recent romantic photo shoot with beau aditya bilagi went viral aad 97
Next Stories
1 “ए आर रहमान कोण आहे?, ‘भारतरत्न’ माझ्या वडिलांच्या पायाच्या नखाच्या बरोबरीचा”
2 श्वेता तिवारीचा फिटनेस मंत्र; मायलेकीच्या वर्कआउटचा व्हिडीओ व्हायरल
3 शाहरुख खानच्या पुढच्या चित्रपटात साउथची नयनतारा हिचं नाव कन्फर्म; चित्रपटाच्या तयारीला सुरूवात
Just Now!
X