News Flash

रसिका सुनीलने गायलेल्या ‘या’ गाण्याला नेटकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद

रसिकाने घेतलं शास्त्रीय संगीत आणि नृत्याचं शिक्षण

झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या लोकप्रिय मालिकेतील शनाया या व्यक्तीरेखेमुळे घराघरात पोहोचलेल्या रसिका सुनिलने गायलेल्या आणि अभिनय केलेल्या ‘तुम बिन मोहे’ या गाण्याला युट्युबवर रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. याबाबत ती सांगते, “आशुतोष सोहोनीने खूप अगोदर एक चाल तयार केली होती. मी अमेरिकेत लॉस एन्जेलीस येथे चित्रपट माध्यमाचे शिक्षण घेत असताना माझी आणि आशुतोषशी चांगली मैत्री झाली. त्याने माझे गायन तपासून पाहिले. मी शास्त्रीय संगीत आणि नृत्याचे शिक्षण घेतले आहे. माझा आवाज योग्य असल्याचं लक्षात येताच त्यावर शब्द लिहिले गेले. मीच मग व्हिडिओचे स्क्रिप्ट लिहिले. त्यात आम्हाला तेथेच अनुप कुलकर्णी या कॅमेरामनची ओळख झाली. सर्वांचाच एकमेकांवर पूर्ण विश्वास होता, त्यामुळे काम करणं सोपे झाले. न्यूयॉर्कचे वातावरण खूप चांगले असल्याने तेथे शूटिंग केले.”

रसिका सुनिल सध्या मुंबईतच माझ्या नवऱ्याची बायको या मालिके शनाया ही भूमिका साकारत आहे. तर आशुतोष सोहोनी सध्या पुण्यात आहे. दोघे मिळून भविष्यात आणखी काही अशी गाणी आणि इतर काही गोष्टी करणार आहेत. तूर्तास दोघेही आपापल्या परीने काही काम करताहेत.

रसिका सुनिलने आणखी एक गाणे नुकतेच गायले आहे. तर नवीन वर्षात तिच्या काही मराठी चित्रपटांचे शूटिंग सुरु होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2020 3:00 pm

Web Title: majhya navryachi bayko fame rasika sunil sing a song ssv 92
Next Stories
1 ‘ते जबरदस्ती माझ्या व्हॅनमध्ये…’, अभिनेत्रीने चित्रपट निर्मात्यावर केला मानसिक छळाचा आरोप
2 ‘ड्रग्ज न घेता कॉमेडी करु शकत नाही का?’, राजू श्रीवास्तवचा भारती सिंहवर निशाणा
3 “चंद्रकांत पाटलांकडून मला कोट्यवधी रुपये…”; महेश टिळेकर ‘भक्तांवर’ संतापले
Just Now!
X