छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘माझ्या नवऱ्याची बायको.’ या मालिकेतील प्रत्येक पात्र हे कायम चर्चेत असते. अभिनेता सचिन देशपांडेने देखील मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली आहे. सध्या सचिन एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सचिन बाबा झाला असून आता त्याच्या लेकीचा व्हर्च्युअल नामकरण सोहळा पार पडला आहे. भन्नाट आयडिया वापरुन मुलीचा व्हर्च्युअल नामकरण सोहळा करण्याचा एक वेगळा प्रयत्न त्याने केल्याचे दिसत आहे.

सचिनने मुलीच्या नामकरण सोहळ्याचा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला आहे. ‘नमस्कार, सध्याच्या कोविड परिस्थितीमुळे, कुठलाही समारंभ करण्यावर अनेक बंधनं आली आहेत, पण त्याच बरोबर सोहळे, समारंभ साजरा करण्याच्या नवनवीन कल्पना ही येऊ लागल्या आहेत. म्हणूनच आमच्या मुलीचा व्हर्च्युअल नामकरण सोहळा करण्याचा एक वेगळा प्रयत्न आम्ही करतो आहोत. तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या लेकीला आशीर्वादही नक्की द्या’ असे सचिनने व्हिडीओ पोस्ट करत म्हटले आहे.

IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: डगआऊटमधून रिव्ह्यूसाठी सूचना; टीम डेव्हिडचं ‘ब्रेनफेड मोमेंट’, पाहा VIDEO
shilpa shetty at salman khan house
Video: ईडीने मालमत्ता जप्त केल्यावर आईसह ‘या’ अभिनेत्याच्या घरी पोहोचली शिल्पा शेट्टी, व्हिडीओ आला समोर
Saranya Ponvannan
पार्किंगच्या जागेवरून वाद अन् थेट जीवे मारण्याची धमकी, प्रसिद्ध अभिनेत्रीविरोधात शेजारणीने पोलिसांत दिली तक्रार
Zomato account suspension leaves delivery agent in tears on eve of sister’s wedding
बहिणीच्या लग्नाआधीच बंद झालं डिलिव्हरी बॉयचं खातं; ढसा ढसा रडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ पाहून झोमटोने दिले उत्तर

सध्या करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे कोणत्याही समारंभाला जास्त लोकांना बोलावणे शक्य नसल्यामुळे सचिनने घरातील काही मोजक्याच लोकांच्या उपस्थित मुलीचे बारसे केले. सचिनने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याच्या मुलीचा व्हर्च्युअल नामकरण सोहळा पार पडला आहे. त्यामध्ये त्याने मुलीचे नाव मीरा ठेवल्याचे सांगितले आहे.

२४ डिसेंबर २०२० रोजी सचिनला मुलगी झाली. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत बाबा झाल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. ’24 डिसेंबर 2020, गुरुवार ची सकाळ आम्ही सगळेच उत्साह आणि काळजी हे भाव एकत्र चेहेऱ्यावर घेऊन हॉस्पिटल मध्ये बसलो होतो. काय होईल ह्याचा उत्साह होता तर सगळ नीट होईल ना ह्याची काळजी होती. तसं बघितलं तर पियुषा आणि माझ्या बाबतीतल्या सगळ्या चांगल्या गोष्टी ह्या गुरुवारी च घडल्या आहेत. मग आमचा साखरपुडा असो, आमचं लग्न असो सगळं गुरुवारीच.. पण हा गुरुवार जरा खास होता, खासच होता कारण ह्या गुरुवारी आमच्या आयुष्यात एक अविस्मरणीय घटना घडणार होती, आम्हाला पूर्ण करणारी व्यक्ती आयुष्यात येणार होती. जवळपास अर्धा तास उलटून गेला होता पियुषा ला ऑपरेशन रूम मध्ये नेऊन, आणि माझे पेशन्स संपायला लागले होते. कधी कळणार कधी कळणार असं सारखं मनात व्हायला लागलं होतं आणि तेव्हढ्यात क्यां क्यां असा रडण्याचा आवाज ऑपरेशन रूम मधून आला, काय झालंय मुलगा की मुलगी? हे ऐकण्याच्या आधीच मी रडण्याचा आवाज ऐकून उड्या मारायला लागलो होतो. मी उड्या मारत असतानाच डॉक्टर आले आणि म्हणाले अभिनंदन मुलगी झाली’ असे त्याने पोस्टमध्ये म्हटले होते.