‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत राधिका आणि गुरुनाथ सुभेदार यांच्या संसारात मिठाचा खडा बनलेली शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनील पुन्हा एकदा मालिका सोडतेय की काय, अशी जोरदार चर्चा रंगली आहे. लॉकडाउनदरम्यान या मालिकेतून अभिनेत्री इशा केसकरनी एग्झिट घेतली होती आणि तिच्या जागी रसिकाने पुनरागमन केलं होतं. मात्र आता रसिका पुन्हा ही मालिका सोडणार असल्याचं म्हटलं जातंय. या सर्व चर्चांवर आता रसिकाने मौन सोडलं आहे. सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत रसिकाने मालिकेतील भूमिकेविषयी खुलासा केला आहे.
शनायाच्या सेकंड इनिंगमधील काही महत्त्वपूर्ण घटनांचा आढावा घेऊयात, असं म्हणत तिने मालिकेतील काही फोटो, व्हिडीओ, मीम्स इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. यातील प्रत्येक फोटोशी निगडीत असलेली पडद्यामागची गंमतसुद्धा तिने सांगितली आहे. या पोस्टच्या अखेरीस तिने मालिकेत पुढे शनाया दिसणार की नाही याचादेखील खुलासा केला आहे.
View this post on Instagram
आणखी वाचा : रसिका सुनील ‘या’ व्यक्तीला करतेय डेट?
‘..आणि आता सर्वांत महत्त्वाचा प्रश्न, शनाया आता मालिकेत दिसणार की नाही? पहिल्यांदा मी मालिका सोडली आणि आता या वेळेस मालिकेतील शनाया देश सोडून गेली आहे. मी पहिल्यांदा गेले तेव्हा मला नव्हतं वाटलं की शनाया मला परत साकारता येईल. त्यामुळे या वेळेस पण माहित नाही, शनाया येईल पण परत कदाचित, कदाचित नाही येणार. शेवटी माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत सर्व काही शक्य आहे’, असं तिने म्हटलंय.
View this post on Instagram
या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिजीत खांडकेकर, अनिता दाते आणि रसिका धबडगावकर यांच्या मालिकेत मुख्य भूमिका आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 3, 2021 10:27 am