21 September 2018

News Flash

राधिका बनणार स्त्री उद्योजिका

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत नवं वळण

हा भाग झी मराठी वाहिनीवर येत्या ३० मार्चला रात्री ८ वाजता पाहता येणार आहे.

‘गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं’, असं म्हणत जवळपास वर्षभरापूर्वी सुरू झालेली ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी स्वावलंबी राधिका, राधिकाच्या नवऱ्याला आपल्या तालावर नाचवणारी नखरेल शनाया आणि राधिका- शनायाच्या कचाट्यात सापडलेला बिचारा गुरुनाथ, या तिघांची अफलातून केमिस्ट्री हेच या मालिकेच्या यशाचं गमक आहे. दिवसेंदिवस रंगत जाणाऱ्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला आहे. नवनवीन ट्विस्ट आणि टर्न यामुळे दिवसेंदिवस रोमांचक आणि रंजक बनत चाललेल्या या मालिकेने आता एक नवीन वळण घेतलंय.

HOT DEALS
  • Lenovo Phab 2 Plus 32GB Gunmetal Grey
    ₹ 17999 MRP ₹ 17999 -0%
  • ARYA Z4 SSP5, 8 GB (Gold)
    ₹ 3799 MRP ₹ 5699 -33%
    ₹380 Cashback

VIDEO : ईशान खत्तरच्या ‘बियॉण्ड द क्लाऊड्स’चा ट्रेलर प्रदर्शित 

मालिकेत राधिकाचा मेकओव्हर करण्यात येणार आहे. आनंद, पानवलकर, जेनी, दामले काका, समिधा आणि रेवती या सगळ्यांच्या सोबतीने ती स्वत:ची कंपनी सुरू करतेय. राधिका आता स्त्री उद्योजिका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आपल्या मुलाकडे म्हणजेच अथर्वकडे दुर्लक्ष न करता ती हा डोलारा उभा करणार आहे. हा भाग झी मराठी वाहिनीवर येत्या ३० मार्चला रात्री ८ वाजता पाहता येणार आहे. गुरुनाथला दिलेलं आव्हान राधिका पूर्ण करणार आहे. राधिकाचं हे बदललेलं रुप आणि गुरुनाथ- शनायाची उडणारी तारांबळ येत्या काही भागात तुम्हाला पाहता येणार आहे.

First Published on March 26, 2018 7:02 pm

Web Title: majhya navryachi bayko new twist in serial