‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही सध्याची झी मराठी वाहिनीवरील चाहत्यांची आवडती मालिका आहे. या मालिकेतून शनाया हे पात्र घराघरामध्ये पोहोचले. सुरुवातील शनायाची भूमिका अभिनेत्री रसिका सुनिलने निभावली होती. परंतु काही कारणास्तव तिला ही मालिका सोडावी लागली. त्यानंतर आता शनायाच्या भूमिकेत ईशा केसकर पाहायला मिळते. नुकताच ईशा आणि रसिका यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांचा हा फोटो पाहून दोन्ही शनाया एकत्र येऊन गॅरी उर्फ गुरुनाथ सुभेदारला धडा शिकवणार का? की त्या दोघी एकत्र दुसऱ्या एका मालिकेत झळकणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकताच दोन्ही शनाया म्हणजेच ईशा आणि रसिका यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो त्यांचा आगामी चित्रपट ‘गर्लफ्रेंड’च्या प्रमोशन दरम्यानचा आहे. त्या दोघीही या फोटोमध्ये अत्यंत ग्लॅमरल अंदाजात दिसत आहेत. रसिका पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार हा चाहत्यांसाठी सुखद धक्काच आहे.

‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटात अमेय वाघ आणि सई ताम्हणक मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उपेंद्र सिंधये यांच्यावर आहे. उपेंद्र यांनीच या चित्रपटाचे लेखनही केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती अनिश जोग, रणजित गुगळे, अमेय पाटीस, कौस्तुभ धामणे, अफीफा सुलेमान नाडियादवाला करत आहेत. हा चित्रपट २६ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Majhya navryachi bayko old and new shanaya coming together avb
First published on: 14-07-2019 at 15:48 IST