News Flash

श्रीदेवी, बॉनी कपूरच्या बंगल्याला आग

श्रीदेवी आणि बॉनी कपूर हे सध्या नवीन घराच्या शोधात आहेत.

| December 23, 2013 02:21 am

श्रीदेवी आणि बॉनी कपूर हे सध्या नवीन घराच्या शोधात आहेत. शनिवारी संध्याकाळी शॉर्टसर्किटमुळे त्यांच्या बंगल्याला आग लागली. ही आग इतकी भयंकर होती की त्यामुळे श्रीदेवी यांच्या बेडरूममधील सर्व वस्तू जळून राख झाल्या आहेत. मात्र, यात कोणतीही जीवीत हानी झालेली नसून, घरातील सर्व सदस्य सुखरूप आहेत.
शनिवारी कपूर कुटुंबिय एका कार्यक्रमास जाण्यासाठी तयारी करते होते. त्यावेळेस मुलगी जान्हवीचा जोरात किंचाळण्याचा आवाज आल्यामुळे सगळे तिथे जमले. बेडरुममध्ये लागलेली आग पाहून श्रीदेवीने प्रसंगावधान राखत सर्व मुख्य स्वीच बंद केले. त्यामुळे संपूर्ण घरभर आग पसरण्याचा धोका टळला. यावेळी बॉनी कपूर हे घरात नव्हते. आगीची बातमी कळताच ते बंगल्यावर पोहचले.
या घटनेनंतर श्रीदेवीची सासू ही मुलगा संजय कपूरच्या बंगल्यावर राहत असून, श्रीदेवी, बॉनी कपूर आणि त्यांच्या मुली हे त्यांचे शेजारी राजकुमार संतोषीच्या घरात राहत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2013 2:21 am

Web Title: major fire breaks out at sridevi boney kapoors bungalow
टॅग : Bollywood,Sridevi
Next Stories
1 ‘मौसम’च्या अपयशानंतरही शाहिदच्या खिशात १८ चित्रपट
2 धूमधडाका!
3 ‘द गुड रोड’ ऑस्कर स्पर्धेतून बाद
Just Now!
X