18 January 2021

News Flash

इस पतंग को ढिल दे….; मकर संक्रांतीवर तयार झालेली ही गाणी तुम्ही ऐकलीत का?

मकर संक्रांतीविषयी ‘या’ ५ गोष्टी माहित आहेत का?

तिळ गूळ घ्या गोड गोड बोला! असे म्हणत तिळाचे लाडू देऊन मकरसंक्रांत आपल्याकडे साजरी केली जाते. यादिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणूनच याला मकर संक्रांत असं म्हणातात. देशभरातील लोक पतंग उडवून हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. दरम्यान या सणाचा उल्लेख अनेकदा बॉलिवूड चित्रपटांमध्येही केला जातो. आजवर अनेक लोकप्रिय गाणी बॉलिवूडने मकर संक्रांतीवर तयार केली आहेत.

 

मकर संक्रांतीविषयी ‘या’ ५ गोष्टी माहित आहेत का?

१. मकरसंक्रांत असा हिंदू सण आहे जो दरवर्षी १४ जानेवारीला येतो. अपवाद वगळता २०१५ मध्ये संक्रांत १५ जानेवारीला आली होती. यादिवशी दिवस आणि रात्र समान असतात.

२. आपल्याकडे हा सण मकरसंक्रांत म्हणून ओळखला जात असला तरी भारताच्या विविध भागात वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. दक्षिण भारतात पोंगल, उत्तरेकडे लोहरी म्हणून तर गुजरातमध्ये उत्तरायण, माघी, खिचडी या नावाने देखील तो ओळखला जातो.

३. मकर संक्रांत फक्त भारतातच नाही तर नेपाळ आणि थायलँडमध्येही साजरी केली जाते. नेपाळमध्ये ‘माघी संक्रांत’ तर थायलँडमध्ये सोंक्रन या नावाने हा सण ओळखला जातो.

४. १ हजार वर्षांपूर्वी संक्रांत ही ३१ डिसेंबरला साजरी केली जायची.

५. एका कथेनुसार भिष्मांनी देखील मकरसंक्रांतीच्या दिवशी आपले प्राण त्यागले होते. काही दंतकथेनुसार या दिवशी ज्या व्यक्तींचे निधन होते त्यांच्या आत्म्याला शांती मिळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2021 1:01 pm

Web Title: makar sankranti 2021 bollywood song mppg 94
Next Stories
1 “क्रिकेटला तरी घराणेशाहीपासून दूर ठेवा”; बिग बींचं ते ट्विट पाहून नेटकरी संतापले
2 ‘आमच्या मुलीचे फोटो काढू नका’, विराट-अनुष्काने केली विनंती
3 Video: एकेकाळी सेटवर ‘हा’ अभिनेता करायचा सर्वात जास्त फ्लर्ट, जया प्रदा यांनी सांगितले नाव
Just Now!
X