12 December 2018

News Flash

मकरसंक्रातीला या मराठी अभिनेत्याने मागितली सर्वांची माफी

एका मालिकेतील त्याची भूमिका प्रेक्षकांनी चांगलीच उचलून धरली होती

शेखर फडके

‘तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’ असे सांगणारा मकरसंक्रांतीचा सण आपल्यासोबत अनेक चांगल्या आठवणी घेऊन येतो. मकरसंक्रातीला करण्यात आलेले गोडाचे पदार्थ, त्यानंतरची पतंगबाजी असे एक ना अनेक आठवणी हा सण घेऊन येतो. आज काळ्या रंगाचे कपडे घातले जातात. अनेकजण या दिवशी मागचा रुसवा- फुगवा विसरुन नव्याने नात्याला सुरूवात करतात. असंच काहीसं मराठी अभिनेता शेखर फडकेही करत आहे.

शेखरने मकरसंक्रांतीचे औचित्य साधून प्रेक्षकांची माफी मागीतली आहे. आपल्या मकसंक्रांतीच्या आठवणींबद्दल सांगताना शेखर म्हणतो की, लहानपणापासून आईने बनवलेले तिळाचे लाडू खाऊन आम्ही मोठे झालोय. आजही संक्रांतीला नवीन कपडे घालून वर्षाचा पहिला सण कुटुंबासोबत साजरा करतो. पण या संक्रांतीला मी प्रेक्षकांची माफी मागत आहे.

काही दिवसांपुर्वी एका मालिकेतील माझी भूमिका प्रेक्षकांनी चांगलीच उचलून धरली होती. पण काही वैयक्तिक कारणांमुळे मला ती मालिका सोडावी लागली होती. मी मालिका का सोडली हा प्रश्न अनेक प्रेक्षकांनी वेगवेगळ्या माध्यमातून विचारला. अनेकांनी याबद्दल नाराजीही व्यक्त केली. पण वैयक्तिक कारणांमुळेच मला ती मालिका सोडावी लागली होती. म्हणूनच आज संक्रांतच्या निमित्ताने माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षकांची मनापासून माफी मागायची आहे.

शेखरने अनेक नाटकांमध्ये आणि मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘तो मी नव्हेच’, ‘घर श्रीमंताचं’, ‘स्माईल प्लिज’, ‘एका लग्नाची गोष्ट’, ‘वन टू काफोर’, ‘क्रॉस कनेक्शन’, ‘बुढा होगा तेरा बाप’, ‘गोष्ट तुझी माझी’, ‘जादू तेरी नजर’, ‘लेले विरुद्ध लेले’, ‘जो भी होगा देखा जायेगा’, ‘पहिलं पहिलं’ यांसारखी नाटके तर ‘सरस्वती’ ‘झोका’, ‘दिल्या घरी तू सुखी रहा’, ‘वादळवाट’, ‘साहेब बीवी आणि मी’, ‘४०५ आनंदवन’, ‘कु कूच कु’, ‘तू भेटशी नव्याने’, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, यांसारख्या अनेक मालिकांमध्ये त्याने काम केले आहे. तसेच ‘धो धो पावसातील वन डे मॅच’, ‘नवरा अवली बायको लवली’, ‘थैमान’, ‘शिवामृत’, ‘भागमभाग’ यांसारखे अनेक सिनेमात त्याने काम केले आहे.

First Published on January 14, 2018 4:36 pm

Web Title: makaransankranti 2017 marathi actor shekhar phadke wishes makarsankranti to his fans