01 October 2020

News Flash

‘सेक्स रॅकेट’ प्रकरणी ‘इकबाल’ फेम श्वेता बसूला अटक

'मकडी' चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या श्वेता बसू प्रसाद हीला सेक्स रॅकेटशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

| September 3, 2014 06:09 am

‘मकडी’ चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या श्वेता बसू प्रसाद हिला ‘सेक्स रॅकेट’शी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबाद शहरातील ‘बंजारा हिल्स’या उच्चभ्रू परिसरातील एका आलिशान हॉटेलमध्ये पोलिसांनी धाड टाकली तेव्हा श्वेता बसू रंगेहात पकडली गेली आहे. ‘सेक्स रॅकेट’शी संबंध असल्याचा आरोप श्वेतावर आहे.
२००२ साली प्रदर्शित झालेल्या ‘मकडी’ चित्रपटातील भूमिकेने श्वेताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या चित्रपटातील भूमिकेसाठी श्वेताला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. त्यासोबत राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘इकबाल’ चित्रपटात देखील श्वेताने अभिनेता श्रेयस तळपदेच्या लहान बहिणीची भूमिका लिलया साकारली होती. तसेच याआधी एकता कपूरच्या ‘कहानी घर घर की’ या टेलिव्हिजन मालिकेमध्येही श्वेताने काम केले आहे. श्वेता सध्या दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करत होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 3, 2014 6:09 am

Web Title: makdee child actor shweta basu prasad arrested for alleged prostitution
टॅग Entertainment News
Next Stories
1 पाहा शाहरुख,दीपिकाच्या ‘हॅपी न्यू इयर’मधील ‘इंडियावाले’ गाणे
2 पाहा ‘बँग बँग’मधील ‘मेहेरबान’ गाणे
3 CELEBRITY BLOG: ‘कल्चर्ड’ मनाला कधी पालवी फुटेल?
Just Now!
X