News Flash

नाना- अनिल कपूर जोडी पुन्हा दिसणार, ‘वेलकम ३’ आणि ‘वेलकम ४’ही येणार

'वेलकम ३' २०२० पर्यंत आणि 'वेलकम ४' २०२१मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा प्रयत्न

वेलकम २

नाना पाटेकर, अनिल कपूर, अक्षय कुमार, परेश रावलचा ‘वेलकम’ हा रुपेरी पडद्यावरचा सुपरहिट चित्रपट ठरला होता. नाना पाटेकर- अनिल कपूरनं साकारलेली उदय शेट्टी आणि मजनू भाईच्या भूमिकेनं प्रेक्षकांना खळखळून हसवलं होतं. ही जोडी ‘वेलकम २’ मध्येही दिसली होती. मात्र ‘वेकलम’च्या दुसऱ्या भागाला म्हणावी तितकी प्रसिद्धी लाभली नाही. पण असं असलं तरी निर्मात्यांनी या चित्रपटाचा तिसरा आणि चौथा भागही काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ‘वेलकम ३’ आणि ‘वेलकम ४’ हे एकापाठोपाठ प्रदर्शित होणार आहे.

‘वेलकम ३’ आणि ‘वेलकम ४’ साठी नाना पाटेकर, अनिल कपूर आणि जॉन अब्राहमचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. ‘वेलकम ३’ २०२० पर्यंत आणि ‘वेलकम ४’ २०२१मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा प्रयत्न निर्मात्यांचा असणार आहे. ‘वेलकम ३ मध्ये नाना, जॉन, अनिल हे त्रिकुट दिसणार असून अहमद खान तिसऱ्या भागाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळतील’ अशी माहिती पीटीआयनं सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे.

वेलकमचं चित्रीकरण पुढील काही महिन्यात सुरू होईल अशी देखील माहिती समजत आहे. २००७ मध्ये ‘वेलकम’ चित्रपट आला होता यात अक्षयसोबत कतरिना कैफ, मल्लिका शेरावत प्रमुख भूमिकेत होती. तर २०१५ साली आलेल्या वेलकम २ मध्ये जॉन आणि श्रुती हसन प्रमुख भूमिकेत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2019 5:01 pm

Web Title: makers are planning to make welcome 3 and welcome 4
Next Stories
1 सौंदर्या रजनीकांत दुसऱ्यांदा अडकणार विवाहबंधनात, पहा सोहळ्यातले खास फोटो
2 … म्हणून हिमांशसोबत केलं ब्रेकअप, अखेर नेहानं सोडलं मौन
3 तनुश्रीला हार्वर्ड विद्यापीठाकडून खास आमंत्रण
Just Now!
X