12 August 2020

News Flash

‘सरबजीत’चा मराठमोळा रंगभूषाकार सुभाष शिंदे

ऐश्वर्या राय बच्चननेदेखील सुभाषच्या कामाचे कौतुक केले.

सध्या ‘सरबजीत’ चित्रपटाची जितकी जोरदार चर्चा सुरु आहे, तितकीच चित्रपटातील मुख्य कलाकार ऐश्वर्या राय बच्चन आणि रिचा चड्डा यांच्या लुकची चर्चा होताना दिसत आहे. सरबजीतच्या चित्रीकरणास सुरुवात होण्यापूर्वी दिग्दर्शक ओमंग कुमार यांच्या कल्पनेतील व्यक्तिरेखा अगदी कुशलपणे प्रत्यक्षात उतरवणारा पडद्या मागचा कलाकार म्हणजे रंगभूषाकार सुभाष शिंदे.
सुभाषने ‘सरबजीत’मध्ये ऐश्वर्या राय बच्चनचे २५ ते ५२ वर्षापर्यंतचे लूक अगदी नैसर्गिक आणि परिपूर्ण दाखवण्याची काळजी घेतली आहे. खुद्द ऐश्वर्या राय बच्चननेदेखील सुभाषच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. ऐश्वर्याचा मेकअप करण्यसाठी त्याने प्रोस्थेटिक मेकअपचा वापर केलेला नाही, ही यातील वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे.
‘रामलीला’, ‘मेरी कॉम’, ‘ब्लॅक’, ‘शिरीन फराद की निकल पडी’सारख्या सुपरहिट चित्रपटांमधील अभिनेत्रींच्या लूक मागे रंगभूषाकार सुभाषचाच हात आहे. लहानपणापासून चित्रकला आणि व्यंगचित्र काढण्याची विशेष आवड असलेल्या सुभाषने मेकअपची कला अवगत करण्यासाठी याबबातचे कुठलेही तांत्रिक शिक्षण घेतलेले नाही. २० वर्षांचा दांडगा अनुभव असलेल्या सुभाषला दीपक राणे यांच्या ‘७२ मैल एक प्रवास’ चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत कार्यरत होण्याची संधी मिळाली. नंतर दिग्दर्शक संजय जाधव यांच्या प्रत्येक चित्रपटासाठी त्याने मेकअपमन म्हणून काम केले. सुभाषने रंगभूषा क्षेत्रात त्याच्या उत्कृष्ट कामगिरीने हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नवे पायंडे पाडले आहेत यात शंकाच नाही.

aishwarya-rai-bachchan-subhash-shinde-01

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2016 12:13 pm

Web Title: makeup artist subhash shinde
Next Stories
1 Ranbir Kapoor: रणबीर कपूरने मुंबईत घेतला ३५ कोटींचा फ्लॅट
2 लुलियाचेही सिक्स पॅक्स..!
3 ‘सैराट’ची ५५ कोटींची झिंगाट कमाई!
Just Now!
X