बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘गुलाबो सिताबो’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात आयुषमान खुरानासोबत त्यांची अनोखी जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील बिग बींचा लूक प्रेक्षकांना थक्क करणारा आहे. कितीही निरखुन पाहिलं तरी अमिताभ यांना ओळखता येणार नाही असा लूक त्यांनी धारण आहे.

अवश्य वाचा – “आई हिंदू होती म्हणून…”; नवाजुद्दीनच्या पुतणीचा धक्कादायक खुलासा

अवश्य वाचा – “याला सत्तेचा माज म्हणतात”; भाजपा महिला नेत्यावर बॉलिवूड निर्मात्याची टीका

अमिताभ बच्चन यांच्या मेकअपचा व्हिडीओ अॅमेझॉन प्राईमने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये मेकअप आर्टिंस्टने बिग बींच्या मेकअपवर घेतलेली मेहनत दाखवण्यात आली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

गुलाबो सिताबो हा चित्रपट येत्या १२ जूनला अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना यांची अनोखी जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शूजित सरकार याने केलं आहे. या चित्रपटाच्या ऑनलाईन प्रदर्शनावरुन खूप मोठा वाद निर्माण झाला होता. चित्रपटगृहांच्या मालकांनी निर्मात्यांविरोधात एक पत्रक जारी केलं होतं. परंतु अनेक वादविवादानंतर अखेर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.