छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ सध्या चर्चेत आहे. अभिनेत्री मलायका अरोरा आणि अनुराग बासू या शोमध्ये परिक्षक म्हणून दिसत आहेत. या शोच्या सेटवरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मलायका अनुरागसोबत डान्स करताना दिसत आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर मलायका आणि अनुरागचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मलायकाने राखाडी रंगाची साडी नेसली आहे. या लूकमध्ये ती अतिशय हॉट दिसत आहे. तर दुसरीकडे अनुरागने कुर्ता परिधान केला आहे. दुर्गा पूजा करताना केले जाणारे पारंपरिक नृत्य करताना ते दोघे दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या व्हिडीओवर अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर आणि सचिन पिळगावर यांनी कमेंट केल्या आहेत. ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’च्या आगामी भागामध्ये सचिन आणि सुप्रिया हे हजेरी लावणार आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये आगामी भागाबाबत उत्सुकता पाहायला मिळेत.

‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ या शो मध्ये कोरियोग्राफर गीता कपूर, मलायका अरोरा आणि अनुराग बासू परिक्षक म्हणून काम करताना दिसतात. मलायका बऱ्याच वेळा शोमधील स्पर्धकांसोबत डान्स करताना दिसते. पण आता तिने अनुराग बासू सोबत डान्स केला आहे.