News Flash

..तर मलायका-अरबाज येणार एकत्र?

मलायका अरोरा व अरबाज खान यांचा घटस्फोट होऊन जवळपास दोन वर्षे होत आली.

मलायका अरोरा, अरबाज खान

अभिनेत्री मलायका अरोरा व अरबाज खान यांचा घटस्फोट होऊन जवळपास दोन वर्षे होत आली. एकीकडे अरबाज व जॉर्जिया यांच्या अफेअरची चर्चा होताना दिसते तर दुसरीकडे मलायका व अर्जुन नेहमीच एकत्र पाहायला मिळतात. पण आता अरबाज व मलायका एका कारणासाठी एकत्र येणार असल्याचं कळतंय. हे कारण आहे छोट्या पडद्यावरील ‘नच बलिये’ हा रिअॅलिटी शो.

रिअल लाइफमध्ये जरी अरबाज-मलायका विभक्त झाले असले तरी छोट्या पडद्यावर त्यांना एकत्र पाहता येणार आहे. ‘द कपिल शर्मा शो’नंतर सलमान खान ‘नच बलिये’च्या नवव्या सिझनची निर्मिती करत आहे. या डान्स शोमध्ये मलायका व अरबाज परीक्षकाच्या भूमिकेत असण्याची शक्यता आहे. या सिझनची थीमसुद्धा हटके आहे. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या जोड्या किंवा ब्रेकअप झालेल्या पार्टनरसोबत सेलिब्रिटीला या शोमध्ये सहभागी होता येणार आहे.

वाचा : अवघे काही किलो वजन वाढल्यामुळे मी गमावली ‘ती’ भूमिका, राधिकाची खंत

मलायका उत्तम डान्सर आहे तर अरबाज याआधीही बऱ्याच कार्यक्रमांमध्ये परीक्षक राहिला आहे. ही दोघंही या डान्स रिअॅलिटी शोसाठी सर्वोत्तम ठरतील असं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप या दोघांनीही कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र चाहते या दोघांना ऑनस्क्रीन एकत्र पाहण्यासाठी नक्कीच उत्सुक असतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2019 5:27 pm

Web Title: malaika arora and arbaaz khan may come together in nach baliye 9 ssv 92
Next Stories
1 Video : ‘KGF’ स्टार यश पुन्हा एकदा होणार बाबा
2 टकाटकमधील ‘या’ दृश्यामुळे प्रथमेश परब आजारी
3 दीपिकाला साकारायची आहे ‘या’ खेळाडूची भूमिका
Just Now!
X