News Flash

मलायका-अर्जुन करणार लवकरच नात्याची अधिकृत घोषणा?

गेल्या काही दिवसांत दोघांना अनेकदा एकत्रही पाहिलं गेलं.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा लवकरच अर्जुनसोबत आपल्या नात्याची अधिकृत घोषणा करणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. २०१७ मध्ये अरबाज खान सोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका तिच्यापेक्षा वयानं लहान अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं. गेल्या काही दिवसांत दोघांना अनेकदा एकत्रही पाहिलं गेलं. मात्र आता ती अर्जुनसोबतच्या नात्याची कबुली देणार असल्याचं म्हटलं जात आहे.

अरबाज- मलायका हे दोघंही वर्षभरापूर्वी विभक्त झाले. त्यानंतर अरबाजनं प्रेयसी जॉर्जिया एण्ड्रीयानी सोबत नव्या आयुष्याला सुरूवात केली. जॉर्जिया आणि अरबाज दोघंही विवाहबंधनात अडकणार असल्याचंही म्हटलं जात आहे. त्यामुळे अर्जुनसोबत आता मलायकानं नवीन आयुष्याला सुरूवात करण्याचं ठरवलं आहे. अरबाजनं जॉर्जियासोबत नव्या आयुष्याला सुरुवात केली यावर मलायकानं कोणतीही हरकत घेतली नाही. मात्र मलायकाचं अर्जुनसोबतचं नातं खान कुटुंबातील अनेकांना त्यातूनही सलमानला मान्य नव्हतं. पण लवकरच मलायका सगळ्यांकडेच दुर्लक्ष करत अर्जुनसोबतचं नातं सर्वांसमोर जाहीर करणार असल्याचं समजत आहे. नुकतंच ‘इंडियाज गॉट टॅलेन्ट’च्या रंगमंचावर मलायकाचा हात हातात घेत अर्जुन आला होता. काही दिवसांपूर्वी हे बॉलिवूडमधलं हे कथीत जोडपं एका फॅशन शोमध्येही दिसलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2018 7:47 pm

Web Title: malaika arora and arjun kapoor are rumoured to be making their relationship public very soon
Next Stories
1 ‘मिर्झापूर’ वेब सीरिजमध्ये श्रिया पिळगांवकर महत्त्वपूर्ण भूमिकेत
2 अडचणी दूर, ‘सेक्रेड गेम्स २’ होणारच!
3 ‘बधाई हो’, आयुषमाननं बॉक्स ऑफिसवर केलं कमाईचं अर्धशतक
Just Now!
X