News Flash

Video :चर्चा तर होणारच, बॉलिवूडमधलं कथित जोडपं मलायका अर्जुन एकत्र

बी टाऊनमध्ये सर्वांना 'मेड फॉर इच अदर कपल' वाटावं अशा मलायका -अरबाजने घटस्फोट घेतला.

अर्जुन कपूर - मलायका अरोरा

बॉलिवूड वर्तुळामध्ये कोणत्या कलाकाराचे नाव कोणासोबत आणि कधी जोडले जाईल याचा काही नेम नाही. असंच नाव अभिनेत्री मलायका अरोरा-खान आणि अभिनेता अर्जुन कपूर यांचं जोडलं गेलं आहे. या दोघांच्या नात्यामुळेच बी टाऊनमध्ये सर्वांना ‘मेड फॉर इच अदर कपल’ वाटावं अशा मलायका -अरबाजने घटस्फोट घेतला. मात्र असं असली तरी या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आणणाऱ्या अर्जुनबरोबर अजूनही मलायका वेळ घालवत असल्याचं पाहायला मिळतं.

अभिनेता-दिग्दर्शक अरबाज खान आणि मलायकाचे नाते घटस्फोटापर्यंत पोहचण्यास अर्जुनच जबाबदार असल्याचं मानण्यात येतं. असं असलं तरी देखील अर्जुन आणि मलायका अनेक वेळा एकत्र दिसून येतात. सध्या ‘लॅक्मे फॅशन वीक २०१८’ मध्ये ही जोडी पुन्हा एकदा झळकली असून त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. डिझायनर कुणाल रावल यांच्या शोमध्ये वरुण धवनला प्रोत्साहन देण्यासाठी अर्जुन आणि मलायका आल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे यावेळी अभिनेत्री जान्हवी कपूरदेखील उपस्थित होती. मात्र साऱ्याचं लक्ष मलायका-अर्जुननेकडेच वेधलं होतं.

दरम्यान, पुन्हा एकदा मलायकासह दिसलेला अर्जुन त्याच्या आगामी चित्रपटांसाठी तयारी करत आहे. अर्जुन लवकरच ‘नमस्ते इंग्लंड’, ‘संदीप और पिंकी फरारा’, ‘इंडियाज मोस्ट वॉन्डेट’ आणि ‘पानिपत’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 11:09 am

Web Title: malaika arora arjun kapoor in fashion week viral video
Next Stories
1 आर. के. स्टुडिओ विकण्याबाबत करिना कपूर म्हणते..
2 क्रितीसोबतही पटेना; सुशांतचं पुन्हा ब्रेकअप
3 शाहरुख म्हणतो, हॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी माझं इंग्रजी वाईट
Just Now!
X