News Flash

करोना रुग्ण आढळल्यानंतर मलायका अरोराची इमारत सील

मलायका मुलगा अरहानसोबत क्वारंटाइनमध्ये राहत आहे.

मलायका अरोरा

अभिनेत्री मलायका अरोरा राहत असलेल्या इमारतीतल करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने तो परिसर कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार ही इमारत ८ जून रोजी सील करण्यात आली. मलायका मुलगा अरहानसोबत क्वारंटाइनमध्ये राहत आहे.

लॉकडाउनच्या काळात मलायका सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहे. विविध फोटो, व्हिडीओ पोस्ट करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते. लॉकडाउनदरम्यान मानसिक स्वास्थ राखण्यासाठी ती विविध उपाययोजना करत आहे. या मिळालेल्या वेळात शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी ती खूप प्रयत्न करतेय. फिटनेससाठी ओळखली जाणारी मलायका सध्या घरीच वर्कआऊट करत आहे. चाहत्यांनाही तिने घरीच राहण्याचं आवाहन केलं आहे.

राज्यात बुधवारी ३ हजार २५४ करोनाबाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. याचबरोबर एकूण संख्या बुधवारी ९४ हजार ४१ वर पोहोचली. तर नवीन १ हजार ८७९ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2020 8:46 am

Web Title: malaika arora building sealed after resident tests positive for covid 19 ssv 92
Next Stories
1 चित्र रंजन : वाईटातून चांगल्याची अनुभूती..!
2 नमस्ते देवियो और सज्जनो… ‘गुगल मॅप’वर आता अमिताभ सांगणार रस्ता
3 दिवाळीमध्ये सलमान आणि अक्षय येणार आमने सामने
Just Now!
X