News Flash

अर्जुन कपूरसोबतचा फोटो शेअर करत मलायकाने दिली प्रेमाची कबुली

त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

सध्या बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चा रंगल्या होत्या त्या अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोराच्या नात्याच्या. आता मलायकाने तिचा आणि अर्जुनचा फोटो पोस्ट करत पहिल्यांदाच अप्रत्यकक्षपणे त्यांच्या नात्याच्या चर्चांना दुजोरा दिला आहे. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अर्जुन कपूरने काल २६ जून रोजी त्याचा ३४वा वाढदिवस साजरा केला. अनेक बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्शाव केला. त्यात अर्जुन कपूरची कथित गर्लफ्रेंड मलायकाने तिच्या पोस्टमधून चाहत्यांना सुखद धक्काच दिला आहे. मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा आणि अर्जुनचा फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये अर्जुनने मलायकाचा हात पकडल्याचे दिसत आहे. दरम्यान हा फोटो पोस्ट करत मलायकाने तिच्या अर्जुनच्या नात्याची कबुली दिली असल्याचे म्हटले जात आहे. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आता या फोटोवर अर्जुनची कमेंट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अर्जुनचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मलायका आणि अर्जुन भारताबाहेर गेले होते. त्यांचे मुंबई एअरपोर्टवरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

सध्या अर्जुन त्याचा आगामी चित्रपट ‘पानिपत- द ग्रेट बेट्रेयल’मध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशुतोष गोवारिकर करत आहेत. तसेच हा चित्रपट ६ डिसेंबर २०१९ रोजी प्रदर्शित होणार असे म्हटले जात होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2019 11:32 am

Web Title: malaika arora confirms dating with arjun kapoor shares romantic photo avb 95
Next Stories
1 सॅम माणेकशॉ यांच्या भूमिकेतील विकी कौशलचा दमदार लूक पाहिलात का?
2 Video : फिटनेस, मेकअप व फॅशनचे टीप्स देण्यासाठी आलियाचं युट्यूब चॅनेल लाँच
3 निर्मिती सावंत का म्हणतेय ‘एक टप्पा आऊट’?
Just Now!
X