News Flash

Video: मलायका अरोराने ‘तारक मेहता’मधील डॉक्टर हाथीसोबत केला डान्स

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या डान्ससाठी लोकप्रिय आहे. सध्या ती ‘इंडियाज बेस्ट डांसर’ या सोनी वाहिनीवरील शोमध्ये परीक्षक म्हणून काम करत आहे. नुकताच या शोमध्ये ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावली होती. दरम्यान मालिकेतील डॉक्टर हाथीने मलायकासोबत डान्स केला आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेची संपूर्ण टीम नुकतीच इंडियाज बेस्ट डान्सर या शोमध्ये पोहोचली होती. शोमध्ये कलाकार मजामस्ती करताना दिसत होते. दरम्यान डॉक्टर हाथीने मलायाकासोबत ‘अनारकली डिस्को चली’ या गाण्यावर डान्स केला आहे. त्यांच्या या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

‘तारक मेहता…’मध्ये आठ वर्ष टप्पू हे पात्र साकारणारा भव्य सध्या काय करतो?

 

View this post on Instagram

 

#SwethaTheBest is bringing her A game to the table to entertain the TMKOC guests! Plus, watch how Haathi bhai grooves with Malaika on #IBDxTMKOC special, this Sat-Sun at 8 pm, on Sony TV. @shweta_warrier @bhawnakhanduja @terence_here @geeta_kapurofficial @malaikaaroraofficial @bharti.laughterqueen @haarshlimbachiyaa30 @maakasamdilipjoshi @mmoonstar @realmandarchandwadkar @amitbhattmkoc @lodha_shailesh @jsonalika @tan_mahashabde @shyampathakpopu @jennifer_mistry_bansiwal @sunayanaf @raj_anadkat @samayshah_5 @ballusuri @palaksidhwani @mayur_vakani @nirmalsoni1 @hasmukhi @priyaahujarajda @iamazharshaikh @kushahh_ @officialsharadsankla19 @tanmayvekaria @jatin.bajaj @officialasitkumarrmodi @tarrakmehtakaooltachashma @taarakmehtakaooltahchashmahnfp

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial) on

सोनी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये मलायका आणि डॉक्टर हाथी यांचा ‘अनारकली डिस्को चली’ या गाण्यावर केलेला डान्स सध्या चर्चेत आहे. डॉक्टर हाथी शिवाय मलायकाने तारक मेहता सोबत देखील डान्स केला आहे. हा व्हिडीओ आता पर्यंत ३७ हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. त्यांच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट देखील केल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2020 11:13 am

Web Title: malaika arora dance with tarak mehta ka oolta chashma doctor hathi avb 95
Next Stories
1 Video : पाहा, प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ‘द व्हाइट टायगर’चा ट्रेलर
2 त्या रात्री नेमकं काय घडलं? हल्ल्यानंतर अभिनेत्री मालवीने केला धक्कादायक खुलासा
3 ‘फॅशन’मधील कंगना-प्रियांकाच्या भूमिका ‘या’ मॉडेल्सच्या आयुष्यावर आधारित
Just Now!
X