वय हा केवळ आकडा असतो हे अभिनेत्री मलायका अरोराकडे पाहिल्यानंतर सहज लक्षात येतं. मलायकाने वयाच्या ४५ व्या वर्षातही स्वत:ला फिट आणि मेन्टेन ठेवलं आहे. आज अनेक तरुणी मलायकासारखी फिगर करण्याचा प्रयत्न करतात. मात्र स्वत: ला फिट ठेवण्यासाठी मलायका तिच्या आहाराकडे आणि व्यायामाकडे विशेष लक्ष देत असते. इतकंच नाही तर ती सक्तीने तिचं डाएट फॉलो करते.

मलायकाच्या सुडौल बांध्याकडे पाहून ती दोन मुलांची आई आहे, याकडे कोणीही विश्वास ठेवणार नाही. मात्र स्वत: ला मेन्टेन ठेवण्यासाठी मलायका प्रचंड मेहनत घेत असल्याचं समोर आलं आहे. मलायका न चुकता दररोज जीममध्ये जाऊन व्यायाम करते. सलग तीन दिवस ती वेट लिफ्टिंग करते. इतकंच नाही तर ती योगा करण्यालाही तितकंच महत्व देत असून रोज योगादेखील करते.
मलायका जीम झाल्यानंतर रोज पोहण्याचादेखील सराव करते. व्यायाम, योगा यासोबतच ती तिच्या डाएटकडे कटाक्षाने लक्ष देते. त्यामुळेच दिवसातून पाच वेळा ती सकस आहाराचं सेवन करते.

असा आहे मलायकाचा डाएट प्लान

१. मलायकाच्या दिवसाची सुरुवात गरम पाणी, मध आणि लिंबू यांच्या सेवनाने होते. त्यासोबतच ती एक लीटर डिटॉक्स वॉटरही पिते.

२. सकाळी गरम पाणी प्यायल्यानंतर नाश्तामध्ये ती एक मोठी वाटी फ्रेश फ्रुट्स खाते. त्यासोबतच इडली/उपमा/पोहे/ मल्टीग्रेन टोस्ट किंवा उकडलेल्या अंड्यामधील पांढरा भाग खाते.

३. दुपारच्या जेवणामध्ये ती ब्राऊन राईस किंवा पोळी खाते. त्यासोबतच एखादी भाजी, उकडलेले कडधान्य खाते. विशेष म्हणजे तिच्या जेवणात चिकन किंवा मासे हे सक्तीने असतात. मलायका रात्रीचं जेवण रोज ७ वाजता करते. या जेवणात ती उकडलेल्या भाज्या, सूप आणि सॅलेड खाते.

४. संध्याकाळच्या नाश्तामध्ये ती पीनट बटर सॅण्डविच खाते.

५. जीममध्ये वर्क आउट केल्यानंतर ती एक केळं आणि प्रोटीन शेक पिते. त्यासोबत न चुकता ओमेगा ३ आणि व्हिटामिनचं प्रमाण असलेल्या पदार्थाचं सेवन करते.

 

View this post on Instagram

 

Healthy lunch….#chickpeatagine @snehatyrewala

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

दरम्यान, मलायका व्यायाम, योगाव्यतिरिक्त डान्सदेखील करते. डान्स हा उत्तम व्यायाम असल्याचं ती म्हणते. त्यामुळेच ती अॅरोबिक्स डान्स, भरतडान्स, जॅझ आणि रशियन बॅले, हिपहॉप हे डान्स प्रकार करते.