गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील लव्ह बर्ड, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर चर्चेत आहेत. मलायकाला तर कित्येकदा अर्जुनसह असलेल्या नात्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. आता पुन्हा एकदा अर्जुनने मलायकाच्या फोटोवर केलेल्या कमेंटमुळे नेटकऱ्यांनी मलायकाला ट्रोल केले आहे.

मलायका अरोराने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर एक ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटो शेअर केला होता. याफोटोमध्ये मलायका योग साधना करताना दिसत आहे. फोटो शेअर करताना मलायकाने ‘Breath. Sterch. Repeat’ असे कॅप्शनही दिले होते. मलायकाच्या या पोस्टवर अर्जुन कपूरने कमेंट केली. कमेंटमध्ये अर्जुनने ‘फुल डे एव्हरी डे’ असे लिहिले होते. अर्जुनची ही कमेंट वाचल्यानंतर सोशल मीडियावर मलायकाला ट्रोल करण्यात आले आहे. ‘मलायका तू अर्जुनसह नाही तर दुसऱ्या कोणत्या विदेशी मुलासह लग्न कर, योग करुन अर्जुन कपूरच्या वया इतकं व्हायचं का’ असे ट्रोलर्सने म्हटले आहे.

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यातील नातं सर्वश्रुत आहे. हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या बऱ्याच बातम्या प्रसिद्ध झाल्या, पण दोघांनी जाहीरपणे कधीच कबुली नव्हती. ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’च्या प्रीमियरच्या वेळी या दोघांनी त्यांच्या नात्याची कबुली दिली. लवकरच ते विवाहबंधनात अडकणार आहेत अशा अनेक चर्चा असल्या तरीही त्यांनी या चर्चांना अधिकृत दुजोरा दिलेला नाही. सध्या अर्जुन ‘पानिपत’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या भूमिकेसाठी त्याने विशेष मेहनत घेतली आहे. या चित्रपटात संजय दत्तसुद्धा दिसणार आहे.