बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री या फिटनेसबाबत जागरुक असल्याचे पाहायला मिळते. त्यातील एक म्हणजे अभिनेत्री मलायका अरोरा. मलायका बऱ्याच वेळा जिममध्ये वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. कोणताही कार्यक्रम असो किंवा पार्टी असो मलायका तिचे जिम रुटीन कधीच चुकवत नाही. फिटनेटच्या बाबतीत नेहमी काळजी घेणाऱ्या मलायकाचा वर्कआऊटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ खुद्द मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ४५ वर्षांच्या मलायकाचा हा व्हिडीओ एखाद्या तरुणीला लाजवेल असा आहे. अनेक बॉलिवूड अभिनेत्री फिटनेसच्या बाबती मलायकाला फॉलो करताना दिसतात. जिमसोबतच मलायका योगा देखील करते. पण सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मलायका एक्सरसाइज करताना दिसत आहे. मलायकाचा हा व्हिडीओ १ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तसेच व्हिडीओमधील एक्सरसाईज पाहून मलायका फिटनेससाठी प्रचंड मेहनत घेत असल्याचे दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

#midweekmotivation …. look Wat u made me do ……. @samsmith @namratapurohit @reebokindia

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

गेल्या काही दिवसांपासून मलायका आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अनेक वेळा दोघे त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना देखील दिसतात. आता अर्जुन आणि मलायकाने त्यांच्या प्रेमाची कबूलीही दिली आहे. त्यामुळे मलायका आणि अर्जुनच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत.