News Flash

नशेत धुंद असलेल्या मलायकाने केला सोनमचा अपमान

सोनमनेही शांतपणे मागे हटण्याचा निर्णय घेतला

पार्टीत उपस्थित असलेल्या सोनम कपूरने मलायकाला सांभाळण्यासाठी मदतीचा हात पुढे केला.

बॉलीवूडमध्ये आयटम गर्ल म्हणून प्रसिद्धीस आलेली खानबहू मलायका अरोरा आपल्या पतीशी म्हणजेच अभिनेता अरबाज खान याच्याशी विभक्त होत आहे. अरबाजसोबत घटस्फोट घेण्याच्या निर्णयावर ठाम असलेली मलायका सध्या एकटेपणाचा आनंद लुटताना दिसत आहे. सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने त्याचा ५० वा वाढदिवस साजरा केला. या बर्थडे पार्टीमध्ये रविवारी फॅशन जगतातील दिग्गजांनी वर्णी लावली होती. तसेच, या पार्टीत हाय स्लिट चंदेरी गाउनमध्ये आलेल्या मलायकाने सर्वांचेच लक्ष वेधले होते. पण, याहीपेक्षा एका वेगळ्याच कारणामुळे मलायका चर्चेत आली आहे.

स्पॉटबॉय ई या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, मनिष मल्होत्राच्या बर्थडे पार्टीत मलायकाने प्रमाणापेक्षा जास्त मद्यपान केले होते. त्यामुळे मद्यधुंद अवस्थेतच ती पार्टीत फिरत होती. त्यावेळी, याच पार्टीत उपस्थित असलेल्या सोनम कपूरने मलायकाला सांभाळण्यासाठी मदतीचा हात पुढे केला. सोनम तिला सावरण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, मलायकाने सोनमची मदत नाकारत तिच्याकडे रागिष्ट नजरेने पाहिले. यावर, सोनमनेही शांतपणे मागे हटण्याचा निर्णय घेतला. स्पॉटबॉयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यावेळी मलायका कोणाचेही ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हती. सोनमने मदतीचा हात पुढे करताच मी स्वतःला सांभाळू शकते असे उत्तर मलायकाने तिला दिले. त्याचक्षणी मग पार्टीचे आयोजन करणारा करण जोहर आणि मनिष मल्होत्रा यांनी पुढे येऊन मलायकाला सांभाळत बाजूला नेले.

दरम्यान, मलायका अरोरा खान आणि अरबाज खान यांनी तब्बल १८ वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी एकमेकांच्या सहमतीने वेगळे होण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. घटस्फोटाच्या निर्णयापूर्वी घटस्फोटावर पुनर्विचार करण्यासाठी दोघांनी बांद्रा येथील कौटुंबिक न्यायालयात काही दिवसांपूर्वी हजेरी लावली होती. न्यायालयातील समुपदेशामध्ये दोघांनीही कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचे समजते. त्यामुळे दोघेही घटस्फोटाविषयीच्या निर्णयावर कायम असल्याचे दिसते. घटस्फोटाच्या निर्णयावर दोघांमध्ये कोणताही तोडगा निघू शकला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 1:52 pm

Web Title: malaika arora insulted sonam kapoor at manish malhotras bash
Next Stories
1 होय, मी त्याच्याशी पैशासाठी साखरपुडा केला- राखी सावंत
2 नेटिझन्सच्या पसंतीस पडला आदित्य चोप्राचा ‘बेफिक्रे’ प्रयोग
3 राणी मुखर्जीने शेअर केला तिच्या मुलीचा पहिला फोटो
Just Now!
X