News Flash

मलाइका आणि अरबाज खान पुन्हा एकत्र येणार?

त्यांच्या नात्यामध्ये पुन्हा एकदा सुसूत्रता येताना दिसत आहे

सेलेब्रिटींचे ब्रेकअप पहिल्यापासूनच चर्चेचा विषय ठरत आले आहेत. सोशल मीडियामुळे या चर्चा चव्हाट्यावर येतच असतात. बॉलिवूडमध्ये आजवर अनेक कलाकारांची वर्षानुवर्षे टिकलेली नातीही अनेक कारणांनी तुटली आहेत. नुकतेच बी-टाऊनमधल्या एका बहुचर्चित जोडप्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अभिनेता-दिग्दर्शक अरबाज खान आणि त्याची पत्नी अभिनेत्री मलाइका अरोरा खान यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. पण, त्यांच्या नात्यामध्ये पुन्हा एकदा सुसूत्रता येताना दिसत आहे. काही कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये या दोघांनाही एकत्र पाहण्यात आले आहे.
नुकतेच अरबाज खानच्या ४९ व्या वाढदिवसा दिवशी मलाइकानेही त्याच्या बर्थडे पार्टीला हजेरी लावली होती. या पार्टीदरम्यान मलाइका आणि अरबाज हे दोघेही फार आनंदात दिसत होते. याशिवाय गेल्या महिन्यातही ईद साजरी करण्यासाठी मलाइकाला गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये खान कुटुंबियांसोबत पाहण्यात आले होते. हे सर्व प्रसंग पाहता मलाइका आणि अरबाज पुन्हा एकदा एकत्र आले आहेत असे वाटत असेल तर तसे नाही. ‘आम्ही अद्याप एकत्र आलो नाहीत’ असे अरबाजने स्पष्ट केले आहे. एका इंग्रजी संकेतस्थळाने अरबाजला त्याच्या आणि मलाइकाच्या या नात्याविषयी विचारले असता ‘तुर्तास आम्ही एकत्र आलेलो नसून वेगळेच आहोत आणि हेच खरे आहे’, असे अरबाज म्हणाला. काही महिन्यांपूर्वी मलाइका आणि अरबाज या दोघांनीही त्यांच्या नात्यात आलेल्या दुराव्याबद्दल प्रसारमाध्यमांसमोर वाच्यता केली होती. त्यांचे हे सतरा वर्षांचे वैवाहिक नाते घटस्फोटापर्यंत पोहोचल्याच्या चर्चांनाही मध्यंतरी उधाण आले होते. त्यामुळे मलाइका आणि अरबाज यांच्या नात्यात नव्याने कोणते वळण येणार याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2016 3:52 pm

Web Title: malaika arora khan and arbaaz khan giving their marriage another chance he clears up all rumours
Next Stories
1 ‘जाऊंद्याना बाळासाहेब’ मधला ‘डॉल्बीवाल्या’ सर्वांच्या भेटीला
2 ‘बॅन्जो’ सिनेमातल्या ‘बाप्पा’ गाण्याचा टिझर प्रदर्शित
3 नर्गिस फाख्रीला घातला ६ लाखांचा गंडा…
Just Now!
X