25 September 2020

News Flash

मातृत्वाच्या जबाबदारीने अडखळले नाही : मलायका

आतापर्यंत केलेल्या भूमिकेवर समाधानी

अभिनेत्री मलायका अरोरा

बॉलिवूडची अभिनेत्री मलायका अरोरा वैवाहिक जीवनातील घडामोडीमुळे काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. अरबाज खानसोबत काडीमोड घेण्याच्या निर्णयानंतर अरबाजसोबत ती बऱ्याचदा दिसली आहे. सलमान खानच्या वाढदिवस असो किंवा खान मंडळीच्या घरातील एखादा कार्यक्रम मलायकाची खान कुटुंबात अजूनही दिसते. अनेक कारणांनी चर्चेत असणाऱ्या मलायकाचा बॉलिवूडमध्ये चांगला गाजावाजा असला तरी, मलायका आतापर्यंत कोणत्याही चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसलेली नाही. मलायका बऱ्याच चित्रपटामध्ये आयटम सॉंग किंवा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसली आहे. तिने आतापर्यंत केलेल्या  भूमिकेवर ती खूश आहे. मुख्य भूमिका साकारण्यासाठी मातृत्वाच्या जबाबदारीमुळे कोणताही अडथळा निर्माण केला नसल्याचे मलायकाने एका मुलाखतीमध्ये सांगितले. छोट्या भूमिकेबद्दल समाधानी असल्याचे स्पष्ट केले. तसेच एखाद्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका करण्याची संधी मिळाल्यास त्याबद्दल नक्की विचार करेन, असेही ती म्हणाली. मलायकाने ‘मुन्नी बदनाम हुई’ आणि ‘छैय्या छैय्या’ या गाण्यामुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली होती.

मलायका अरोरा सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. काहीदिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावरुन एक फोटो शेअर केल्याने ती चर्चेत आली होती. मुलगा अरहानसोबतचा जुना फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिने जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले होते. अरबाज आणि मलायका यांचा मुलगा अरहान आता १४ वर्षाचा असून तिने चिमुकल्या अरहान सोबतचा फोटो शेअर करत तिने आठवणींना उजाळा दिल्याचे दिसले होते. अरहानच्या जन्मावेळी म्हणजेच २००२ मध्ये मलायकाने तिच्या चिमुकल्या मुलासोबत फोटोशूट केले होते. या फोटोमध्ये मलायका हॉट अंदाजात दिसली होती. या फोटोमध्ये मलायकाने चिमुकल्या अरहानला कवटाळले असल्याचे दिसले होते.

बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोरा या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोरा खान यांनी जेव्हा वेगळे राहणे सुरु केले, तेव्हाच त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्यांना उधाण आले होते. त्यानंतर मलायका अरोरा आणि अरबाज खानच्या घटस्फोटाची चर्चा रंगली. अखेर तब्बल १८ वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी एकमेकांच्या सहमतीने वेगळे होण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 8:32 pm

Web Title: malaika arora khan says i do not wants to be an actress
Next Stories
1 ‘जग्गा जासूस’मध्ये असणार तब्बल २९ गाणी!
2 अभिनेत्री श्रुती उल्फतची जामीनावर सुटका
3 प्रेमातला गुलाबी अनुभव सांगणारी ‘प्रेम हे.. ‘ नवी मालिका
Just Now!
X