News Flash

‘अर्जुन तू आसपास असतोस तेव्हा’… काय म्हणाली हे मलायका

अलीकडेच मलायका आणि अर्जुनने...

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या नात्याची नेहमीच मीडियामध्ये चर्चा असते. सोशल मीडियावरुन हे जोडपं नेहमीच परस्परांबद्दल वाटणाऱ्या प्रेम भावना व्यक्त करत असतं. अलीकडेच मलायका आणि अर्जुनने धर्मशाळामध्ये एकत्र वेळ घालवला. ‘भूतपोलीस’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी अर्जुन धर्मशाळाला गेला होता. त्यावेळी मलायका तिथे पोहोचली.

अर्जुन, मलायका, तैमूर, सैफ आणि करीना यांच्या धर्मशाळामधील एकत्रित फोटोंची त्यावेळी सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर धर्मशाळामधील अर्जुनसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनची बरीच चर्चा आहे. “अर्जुन तू आसपास असतोस, तेव्हा कधीच कंटाळा येत नाही” असे मलायकाने या फोटोला कॅप्शन दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

या फोटोमध्ये हे जोडपे मनापासून हसताना दिसतेय. मलायकाने तिच्या धर्मशाळा ट्रीपचे बरेच फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ‘भूतपोलीस’च्या निमित्ताने सैफ आणि अर्जुनसाठी काम आणि सुट्टया असा दुहेरी योग चालून आला होता. दिवाळीतल्या सुट्ट्या चौघांनी एकत्र निर्सगरम्य धर्मशाळामध्ये घालवल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2020 5:35 pm

Web Title: malaika arora never has a dull moment when usual suspect arjun kapoor is around dmp 82
Next Stories
1 मंत्र्यासोबत डिनर करण्यास दिला नकार, विद्या बालनच्या सिनेमाचं चित्रीकरण थांबवलं
2 ‘द कपिल शर्मा शो’मधून ‘या’ कलाकारांनी घेतली एक्झिट
3 ‘सन्स ऑफ द सॉईल: जयपूर पिंक पँथर्स’मधून उलगडणार महाराष्ट्रातील ‘या’ कबड्डीपटूचा जीवनप्रवास
Just Now!
X