मलायका आणि अरबाज खान यांनी २०१७ मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर दोघांनीही वेगळ्या वाटा निवडल्या. मात्र अरबाजसोबत घटस्फोट घेऊ नकोस असा सल्ला कुटुंबीयांनी आदल्या रात्रीपर्यंत मला दिला होता असं मलायकानं एका मुलाखतीत सांगितलं.
‘व्हॉट वुमन वाँट’ या करिना कपूरच्या रेडिओ शोमध्ये मलायका अरोरानं उपस्थिती लावली. यावेळी मलायकानं आपल्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी उलगडल्या. ‘अरबाजसोबत घटस्फोट घेऊ नये असा सल्ला कुटुंबीयांनी आणि मित्रपरिवारानं मला दिला होता. घटस्फोटाच्या आदल्या रात्रीपर्यंत मला विचार करण्याची संधी कुटुंबीयांनी दिली होती. कोणालाही हा घटस्फोट व्हावा असं वाटतं नव्हतं त्यामुळे मित्रपरिवार आणि कुटुंबीयदेखील या घटस्फोटाच्या विरोधात होते. मात्र मी आणि अरबाजनं विभक्त होण्याचं निश्चित केलं.’ असं ती म्हणाली.
‘माझ्या मित्र परिवाराला, कुटुंबीयांना माझी काळजी वाटत होती त्यामुळे मी निर्णय बदलावा असं त्यांना मनापासून वाटत होतं पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात’, असं मलायकानं करीनाशी बोलताना सांगितलं. सध्या मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे. अर्जुनसोबतच्या नात्याची औपचारिक घोषणा तिनं केली नसली तरी ते दोघंही लग्न करतील अशाही चर्चा आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 19, 2019 5:05 pm