News Flash

मलायकाचा पोल डान्स सुपरहिट!

मौनी रॉयही मलायकाचा पोल डान्स पाहून थक्क झाली

मलायका अरोरा

बॉलिवूडची ग्लॅम दिवा म्हणून प्रसिद्ध असलेली मलायका अरोरा कोणत्याही पार्टीला गेली तर साऱ्यांचे लक्ष तिच्यावर खिळलेले असते. फॅशन स्टाइलसाठी प्रसिद्ध असलेल्या मलायकासमोर तरुण पिढीच्या मॉडेल्सही फिक्या पडतील. एम टीव्हीच्या एम टीव्ही इंडियाज् नेक्स्ट सुपर मॉडेल या शोमध्ये मलायका परिक्षक आहे. या शोदरम्यान तिने एक पोल डान्सही करुन दाखवला. स्वतः मलायकाने तिचा पोल डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओला अगदी थोड्याच वेळात हजारो लाईक्स मिळाले. तिच्या चाहत्यांनीही पोल डान्सचे कौतुक करुन अनेक कमेंटही केल्या.

या शोच्या परिक्षकांनी स्पर्धकांना एक पोल डान्स करुन दाखवण्यास सांगितले होते. सर्वच स्पर्धकांनी त्यांच्यापरिने उत्तम पोल डान्स करुनही दाखवला. पण या सर्व मॉडेल स्पर्धकांसमोर जेव्हा मलायकाने पोल डान्स केला तो खूपच उजवा ठरला. या भागात टीव्ही अभिनेत्री मौनी रॉयही उपस्थित होती. इतरांप्रमाणेच मौनीही मलायकाचा पोल डान्स पाहून थक्क झाली.

मलायकाला जवळपास १५ वर्षांनी पोल डान्स करताना पाहिले गेले. तिने याआधी ‘कांटे’ या सिनेमात ‘माही वे’ गाण्यासाठी पोल डान्स केला होता. तिचे हे गाणे त्या काळात कमालीचे गाजले होते. आजही पोल डान्ससाठीचे गाणे म्हणून ‘माही वे’ गाण्याचेच नाव प्रामुख्याने घेतले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 1:25 am

Web Title: malaika arora pole dance photos on tv show mtv indias next top model photos
Next Stories
1 शब्दांच्या पलिकडले : रात कली एक ख्वाब में आई
2 Bigg Boss 11: …तर चपलेने मारेन, या अभिनेत्याला अर्शी खानची धमकी
3 ‘मी २०० टक्के भन्साळींसोबत’
Just Now!
X